Home यवतमाळ यवतमाळात जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा

यवतमाळात जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा

235

यवतमाळ  – जागतिक छायाचित्र दिन (१९ ऑगस्ट) यवतमाळात छायाचित्रकारांच्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधत छायाचित्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांसाठी अल्पोपहार वाटपाचा उपक्रम राबविला.

अल्पोपहार वाटप कार्यक्रमानंतर छायाचित्रकारांनी शहरात बाईक रॅली काढली. विविध मुख्य मार्गांवरून ही रॅली निघून शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत जाजु चौक येथे तिचा समारोप झाला. रॅलीच्या समारोपानंतर केक कापून जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात आला.

या उपक्रमात कॉटन सिटी फोटोग्राफर सस्था यवतमाळ व युवा छायाचित्रकारांसोबतच जेस्ट पिढीनेही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सामाजिक उपक्रमासह उत्साहात साजरा झालेल्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.