
वक्फ धार्मिक अधिकारांचे रक्षण करण्यास आम्ही सज्ज*
*काळ्या कायद्याला रद्द करा,वक्फ अधिकारांसाठी वेळप्रसंगी आपले बलिदान देऊ
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राष्ट्रीय सचिव मौलाना उमरैन महफूज रहमानी
यवतमाल – वक्फ सुधारणा कायदा 2025 च्या विरोधात यवतमाळ मध्ये जिल्हास्तरीय भव्य जनआक्रोश जनसभेचे आयोजन करण्यात आले.या जनसभेची अध्यक्षता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सेक्रेटरी मौलाना महफूज रहेमानी यांनी केली.प्रमुख वक्ते म्हणून, वहदत ए इस्लामीचे कुलहिंद सदर जियाउद्दीन सिद्दिकी औरंगाबाद, जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्र चे सदर इंडिया मौलाना रफिऊद्दीन अशरफी दिल्ली,विशेष अतिथी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्ड सदस्य अश्फाक कासमी,अ.भा.ओबीसी महासंघाचे ज्ञानेश्वर गोरे, एडवोकेट जयसिंग चव्हाण यांनी जनआक्रोश सभेला संबोधित केले.वक्फ सुधारणा कायद्या 2025 रद्द करा अशी मागणी करीत वक्फ काळ्या कायद्याविरुद्ध वक्फ बचाओ, दीन बचाओ कमिटी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड समिती यवतमाळ द्वारे 14 जून रोजी संध्याकाळी पांढरकडा मार्गावरील रॉयल पॅलेस येथे या जनाक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते.यात हजारोंच्या संख्येने वणी,दारव्हा,दिग्रस,आर्णी,बाबुलगाव,कळंब, घाटंजी,यवतमाळ,तसेच जिल्ह्यातून मुस्लिम नागरिक सामील झाले.या प्रसंगी मौलवी सय्यद हमजा,यवतमाळ जिल्हा तबलीगी जमात चे अमीर हाजी अब्दुल रजाक,,यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगूळकर,काजी गझनफर अली पांढरकवडा, मौलाना अय्युब पाटनबोरी,मौलवी अब्दुल माजिद आर्णी,सय्यद युनूस बुखारी पुसद, मौलाना रिझवानऊल्लाह नदवी नेर, मौलाना सादिक दिग्रस, मुफ्ती सादिक दारवा,मौलाना अजहर नदवी कळंब मंचावर उपस्थित होते.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्ड विदर्भचे समन्वयक मुफ्ती फिरोज खान यांनी सभेची प्रस्तावना केली.ते म्हणाले की वक्फ कायद्याविरुद्ध आणि दीन, शरीयत संरक्षणासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्ड वर मुस्लिमांचा पूर्ण विश्वास असून बोर्ड सर्व जमातींना सोबत घेत वक्फ काळ्या कायद्याविरुद्ध सामोरे जात आहे,आमच्या धार्मिक अधिकारांच्या रक्षणासाठी बोर्डच्या नेतृत्वात देशभरात आंदोलन होत अडून,या कायद्यामुळे बोर्डच्या सर्व जिम्मेदारांची झोप उडाली आहे,जर हा कायदा लागू झाला तर आमचे जीवन जगणे कठीण होईल,हा कायदा आम्हास मंजूर नसून हा असंवैधानिक कायदा रद्द होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार.तर AIMPLB चे जिल्हा समन्वयक मुफ्ती इमामूल्लाह खान म्हणाले की मस्जिद आणि वक्फ संपत्ती अल्लाहची मिल्कियत असून यावर कुणाचे अधिकार नाही,या काळ्या कायद्याविरुद्ध देशात जागरण सुरू असून त्यांनी या जनसभेचे महत्व विषद केले.
प्रमुख वक्ते जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र सदर मौलाना इलियास फलाही म्हणाले की,आम्ही या असंवैधानिक कायद्याला कोणत्या परिस्थितीत रद्द करून दम घेणार, जो समाज आपल्या रक्षणाची चिंता करतो त्याला ईश्वराची मदत मिळते,आम्ही सर्व या काळ्या कायद्याविरुद्ध असून या सरकारने वक्फ संपत्तीला एखाद्या पब्लिक प्रॉपर्टी सारखे परिभाषित केले आहे,पण वक्फ ही जनतेची संपत्ती आहे,कोणत्याही सरकारने आतापर्यंत या धार्मिक अधिकाराला छेडले नव्हते,पण या सरकारने हा काळा सुधारणा कायदा बनविला ज्याला आम्ही पूर्णपणे अस्वीकार करतो,जर आम्ही याबाबत आज शांत राहिलो तर येणारी आमची पिढी आम्हाला माफ करणार नाही.प्रमुख वक्ते वहदत इस्लामी राष्ट्रीय अध्यक्ष जियाउद्दीन सिद्दीकी यांनी संबोधित करताना म्हटले की वर्तमान सत्ता वक्फ ला संपवू इच्छिते,यामुळेच त्यांनी याला उम्मीद नाव दिले,हे मुस्लिमांच्या डोक्यातून ते वक्फ नाव मिळविण्याचे षड्यंत्र आहे,वक्फ अल्लाहच्या नावाने चिरायू दान असतो,तर वक्फ बोर्ड सरकार बनविते त्यामुळे ह्या दोन्ही बाब वेगळ्या आहे,वक्फ सुधारणा कायदा वक्फ प्रॉपर्टी बोर्डच्या माध्यमातून बनविला असून बोर्ड च्या माध्यमातून ASI ला अधिकार देत वक्फ धार्मिक अधिकार संपवण्याचे डाव रचले आहे,यात अनेक कठीण नियम बनविले आहे,वक्फ नाव मिटावा म्हणून हा नवा कायदा बनविला.मात्र ज्यांनी आपल्या रक्त आणि घाम गाळून वक्फ केला त्या धार्मिक संपत्ती अधिकार संरक्षणाची आणि त्याला जनहितासाठी पुढील पिढीला स्थानांतरित करण्याची आमची जबाबदारी आहे.
यावेळी प्रमुख वक्ते मौलाना रफीउद्दीन अशरफी यांनी आपल्या आक्रमक शैलीतून म्हटले की,देशातील स्वाभिमानी मुसलमानांना इस्लाम,शरीयत आणि संविधानविरोधात बनविलेला हा काळा कायदा कोणत्याही परिस्थितीत मंजूर नाही.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संसदेतील भाषणाचे संदर्भ देत त्यांनी त्यांचा खरपूस समाचार घेत म्हटले की,तुम्ही याला असंवैधानिक पद्धतीने बनवून याला मान्य करण्यासाठी संसदेत धमकी देत आहेत,तर एका आम्ही या वक्फ सुधारणा कायद्याला पूर्णपणे खारीज करतो,जर सरकारने हा कायदा रद्द केला नाही तर पुढील टप्प्यात आम्ही देशभरातून आता याला रद्द करण्यासाठी दिल्ली कडे कूच करू.तर एड जयसिंग चव्हाण म्हणाले की,देशात
सर्वांना आपला मत मांडण्याचा अधिकार संविधानने दिला तसाच वक्फ अधिकारही दिले आहे,वेळोवेळी देशात असे मुद्दे समोर करून जातीयवादी शक्ती मुस्लिमांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतात, मात्र
आपण रेशनॉलिस्ट असायला हवे,आपणास सनदशिर मार्गाने चालायचे आहे.देशात सध्या ब्रिटिशांची फूट डालो राज करोची या सत्ताधाऱ्यांची नीतीला हाणून पाडायचे आहे.वक्फ सुधारणा कायदा रद्द करण्यासाठी रक्ताचा थेंब न पडता तक्तापालट होऊ शकतो ही ताकत आपल्यात आहे,कारण या सत्ताधाऱ्यांपेक्षा पेक्षा जास्त भारतीय आम्ही आहो.संघटितपने या बिलाचा विरोध करून आम्हाला रद्द करायचे आहे.यावेळी ओबीबीसी महासंघ राष्ट्रीय समन्वयक ज्ञानेश्वर गोरे यांनीही संबोधित केले.
या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी AIMPLB जिल्हा समन्वयक मुफ्ती इनामुल्लाह खान,यवतमाळ वर्किंग कमिटी चे सदर मौलाना शारिक मजाहीरी,कुल जमात विफाक,औकाफ बचाव संविधान बचाव समितीचे सदर डॉ शेख मुजीब,वक्फ बचाओ दीन बचाओ अभियान समितीचे मुफ्ती सोहेल,हाफिज शेर खान,हाफिज अनिस,शकील अहमद खिजर,जिया मिनाई, एड.इमरान देशमुख,खलील अहमद,शकील अहमद,साजिद पटेल,मुश्ताक गौरी,अली इमरान,निसार फारुकी,समीर साहीर, आसिम अली, एहतेशाम अहमद, जुनैद जौहर,जाफर खान,निजाम काजी,सय्यद शहाबुद्दीन, नाजीम खान,हाफिज खालिद सैफउल्लाह,वसीम खान,अशरफ खान,उजैर पटेल, ॲड.काशीफ रहेमान, फरहान मुजतबा,आमिर अहमद,नावेद खान,यांच्यासह शेकडो लोक परिश्रम घेत आहेत.
बॉक्स
आपल्या अध्यक्षीय भाषणात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे राष्ट्रीय सचिव मौलाना उमरैन महफूज रहमानी म्हणाले की,वक्फ सुधारणा कायदा 2025 रद्द व्हावा यावर आपला आवाज बुलंद करण्यासाठी जमा झाले.मुस्लिम नागरिक या सभेमध्ये कुणाला काही मागायला नव्हे तर आपल्या अधिकारांचा आढावा घेण्यासाठी जमा झाले आहे.कारण वक्फ माध्यमातून मुसलमान देशाला योगदान देणारे समाज आहे.मात्र केंद्र सरकारने वक्फ धार्मिक अधिकारांच्या आणि संविधानाचे उल्लंघन करीत सुधारणांच्या नावावर बनविलेला, वक्फ संपत्तीला हडपण्यासाठी हा कुटील डाव रचला आहे. सरकार जो पर्यंत हा काळा कायदा परत घेत नाही, तो पर्यंत आम्ही पूर्ण ताकदीने आपला आवाज बुलंद करू,जर सरकार या विरोधाला जुर्म करार देत असेल तर आम्ही हा जुर्म हजार वेळा करणार.केंद्र सरकारचा मंत्री पुन्हा शाहीन बाग सारखा लढा उभारला तर जालियावाला बाग सारखा गोळ्या झाडण्याची धमकी देतो,तर त्याला सांगा की भयभीत होणे आमची फितरत नाही,कारण आम्ही इंग्रजांची माफी मागणाऱ्यांची औलाद नव्हे,वक्फ धार्मिक अधिकारांच्या रक्षणासाठी व या काळ्या कायद्याला रद्द करण्यासाठी आम्ही मोठा बलिदान देण्यासाठी सज्ज आहोत,तुमच्या गोळ्या कमी पडणार पण आमच्या छात्या कमी पडणार नाही.देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आणि देशातून इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी मुसलमानांनी बलिदान दिल्याचा इतिहास आहे,आता या सरकारने वक्फ सुधारणा कायदा आमच्यावर लादून मस्जिद,मदरसे, खानकाह, कब्रस्तानाच्या वक्फ जमिनी हडपण्यासाठी शिकंजा कसला आहे. या अन्यायाविरोधात आवाज बुलंद होऊन औकाफ रक्षणासाठी आम्ही प्राण निछावर करण्यास मागे हटणार नाही,वक्फ रक्षणासाठी भावना कायम ठेवा,पुढे परिस्थिती गंभीर होऊ शकतो,आम्ही आपल्या देशवासीयांना सोबत घेऊ,जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत हा लढा कायम ठेवू,वक्फ सुधारणा कायदेविरुद्ध बोर्डाच्या आव्हानांवर देशात अल्लाह ने एकता कायम केली आहे,याला देशात प्रतिसाद ही आमची सर्वात मोठी ताकद आहे,या सामूहिक एकतेसमोर सरकारला आपले गुडघे टेकावेच लागेल,यानंतर आता 23 जुलैनंतर आंदोलनाच्या पुढील टप्प्याची घोषणा होईल.












































