Home विदर्भ वर्धात गुटखा तस्करी करनारी सोनू आणि मधूची जोडी …?

वर्धात गुटखा तस्करी करनारी सोनू आणि मधूची जोडी …?

341

बाबुळगाव येथील गुटखा माफिया गेल्या काही महिण्यापासून आपले बस्तान वर्धा जिल्ह्यात मांडण्यास सुरुवात केली असल्याचे दिसत आहे. त्याच्याकडून वर्धा जिल्ह्यात गुटख्याचा अवैधरित्या पुरवठा करण्यात येत आहे. असे असतानाही वर्ध्यातील येथील पोलिस व अन्न औषध प्रशासन मात्र या गंभीर बाबीकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसत आहे.
या अवैध गुटखा तस्करीचे केंद्र असलेल्या वर्धा येथील सोनू व मधू नावाच्या गुटखा माफियाने जिल्ह्यात सर्वदूर आपले बस्तान मांडले आहे. असे असतानाच त्याने आता आपला मोर्चा वर्ध्यातील प्रत्येक तालुक्याकडे वळवला आहे. वर्धा शहरासह ग्रामीण भागात जोमात गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री केल्या जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दररोज गुन्हेगारांच्या मुसक्या आवळीत असल्याच्या कारवाई दिसून येत आहे. असेच एक कारवाही दिनांक २/६/ २०२५ ला पुलगाव येथील सेंट्रल फोटो स्टुडिओ जवळ पुलगाव पोलिसांनी रेड केला असता आरोपी पंकज तिलकराज बत्रा व 41 वर्ष यांच्या जवळून वेगवेगळ्या सुगंधीत तंबाखू आणि पान मसाले जाफरांनी जर्दा व विविध प्रकारचे तंबाखू सह एकूण १ लाख ८२ हजार ६७१ रुपयांचे मुद्देमाल जप्त करीत आरोपीला अटक करण्यात आले आहे….प्रशासनाच्या सहकार्यानेच वर्धा येथील बंटी आणि धामणगाव येथील बबली वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आपले बस्तान बसवण्यात यशस्वी होत असल्याची चर्चा सद्या सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे आता जिल्हा पोलिस अधीक्षक यांनीच या गुटखा विक्रीच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी होत आहे.


अन्न, औषध प्रशासनाला गांभीर्य नसल्याने जिल्यातील प्रत्येक तालुक्यात सर्रास गुटखा विक्री होत आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह महिला, पुरुष गुटखा व्यसनाच्या आहारी जात आहेत. यामुळे अनेकांना कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराने जखडले आहे. तर काहींना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. एवढा जीवघेणा प्रकार तालुक्यात सुरू असताना अन्न औषध प्रशासन विभाग झोपेत आहे.