
दीपक यंगड
लोहारा, यवतमाळ – अलीकडे लोहारा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या चौसाळा जंगलात घडलेली एक धक्कादायक घटना संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजवणारी ठरली आहे. एका शिक्षिकेने स्वतःच्या पतीचा, जो की शिक्षक होता, विष घालून खून केला आणि मृतदेह नष्ट करण्यासाठी काही शालेय विद्यार्थ्यांची मदत घेऊन त्याला जंगलात जाळून टाकले.













































