Home विदर्भ आर्वी येथील तरुणाला दिली जीवे मारण्याची धमकी, पोलिसात लेखी तक्रार….

आर्वी येथील तरुणाला दिली जीवे मारण्याची धमकी, पोलिसात लेखी तक्रार….

1073

वर्धा – आर्वी येथिल विधान परिषदेचे आमदार दादारावजी केचे यांनी काही साथीदाराच्या माध्यमातून मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असे स्पष्ट नमुद करून आर्वी येथिल फर्निचर व्यापारी हुजेफा बोहरा यांनी आर्वी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दिनांक १४ मे रात्रीच्या सुमारास पुलगाव मार्गावरून प्लायउड फॅक्टरी जवळ असलेल्या एका हॉटेलातून जेवण करून एक्टिवा  कंपनीच्या वाहणाने घरी जात असता मागून भरधाव वेगाने येत असलेल्या एक लाल रंगाच्या गाडीने येऊन डाव्या बाजूने हुजेफा यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली. त्या धडकेने पुढे चालत आलेल्या ट्रेलर वर हुजेफा यांची दुचाकी आदळली. यात हुजेफा यांचे दोन्ही हात आणि एका पायाला गंभीर रित्या दुखापत झाली…
हुजेफा यांनी क्षणाचाही विलंब न करता वर्धा येथिल एका खाजगी डॉक्टरांकडे धाव घेतली तेथे हुजेफा यांच्या हाताचे ऑपरेशन करावे लागेल, अन्यथा दोन्ही हात निकामी होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली..सदर तक्रारीत आर्वी येथिल एक वर्तमान पत्राचे पत्रकार आणि एक वकील असलेल्या व्यक्तीचा समावेश आहे.
या प्रकरणात सविस्तर असे की, काही दिवसापूर्वी आर्वी लगत  देऊरवाडा गावाला लागून असलेल्या वर्धा नदीवर रेती घाट सुरू असुन तो घाट होजेफा बोहरा याचा असल्याचा आरोप करून, केचे यांनी या विषयाला चांगलेच रंगविले होते. केचे यांना त्या ठिकाणी कोणतेही रेती काढण्याचे साहित्य अथवा खुद होजेफा बोहरा यानेच ती रेती काढली असा कोणताही पुरावा मिळाला नसतांना केचे यांनी बोहरा याची मा. मुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार केली होती. मात्र दिलेल्या तक्रारीत हुजेफा बोहरा यांनी सदर प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे तक्रारी नमूद केलेल्या व्यक्तींनी माझ्या घातपात करण्याच्या उद्देशाने हा अपघात केला अशी माझी शंका असून आपण याची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा तक्रारीत दिलेल्या तीनही व्यक्तीपासून माझ्या जीवितास धोका असून पुढील काळात माझ्या जीवितास काही झाल्यास वरील तीन लोकांना जबाबदार धरण्यात यावे असें या तक्रारीत नमूद केले आहे….