Home यवतमाळ जिगरी जोडीचे दहावीत कौतुकास्पद सुयश..

जिगरी जोडीचे दहावीत कौतुकास्पद सुयश..

355

एकाला मिळाले ९४ टक्के तर दुसऱ्याला ८५टक्के गुण .
—————————————-
घाटंजी (तालुका प्रतिनिधी ) – तालुक्यातील भांबोरा येथिल उत्कर्ष रेणुका गणेश राठोड तर विरूळ (कवठा) येथिल सुशांत बबिता प्रकाश चव्हाण हे नात्याने सख्खे मामे-आते भाऊ यांची एक आगळी वेगळी जिगरी जोडी नावारूपास आहे. प्रत्येक बाबीत अग्रेसर राहणाऱ्या जोडीने दहावी बोर्डाच्या परीक्षेतही आपली उत्तम छाप कायम ठेवत उत्कर्ष राठोड याने ९४ टक्के तर सुशांत चव्हाण याने ८५ टक्के घेत घवघवीत यश संपादन केले.
भांबोरा येथिल उत्कर्ष राठोड हा सुशांतचा सख्खा आते भाऊ तर विरूळ येथिल सुशांत चव्हाण हा उत्कर्ष राठोड चा सख्खा मामे भाऊ होते. हे दोघेही लहानपणी पासूनच नातेवाईकात जिगरी जोडी म्हणून नावारूपास आली. कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर राहणाऱ्या या जोडीला त्यांच्या पालकांची परिस्थिती जेमतेम असतांना सुद्धा यवतमाळ येथे शिक्षणासाठी दाखल केले. अश्यातच ते गावाकडील सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात जातीने हजर राहून सर्वांचे लक्ष वेधून घेत पालकांना हुरूप वाटेल अशी कामगिरी बजावत होते.त्याशिवाय आम्हाला शहरात असलेली कोणत्याही प्रकारची महागडी शिकवणी लावायची नाही. शिकवणीसाठी आमच्यावर खर्च करू नये असे पालकांना ते वारंवार सांगत होते. त्याबद्दल पालकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी आपले मुलं प्रविण्य गटात येणार नाही असे वाटत होते. ऐन परीक्षाकाळ जवळ आला असतांनाही ही जोडी खेळण्याचे सोडत नव्हते. ते आपल्या एवल्याश्या भावंडासोबतीही मनोसोक्त खेळण्याचा आनंद घेत होते. अश्यातच त्यांनी इय्यता दहावीची बोर्डाची परीक्षा दिली. मात्र पालकांना व नातेवाईकांना हे केवळ पास होतील असे वाटले. मात्र या जिगरी जोडीने आम्ही चांगल्या टक्केवारीने पास होणार ही बतावणी केली. यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. मात्र त्यांच्यातील जिद्द, व अथक परिश्रम हा हेवा वाटण्याजोगा होता. यामध्ये निकाल जाहीर होताच त्यांच्या निकाल बघून पालकांना व नातेवाईकांना आश्चर्याचा धक्काचं बसला. यामध्ये उत्कर्ष राठोड याला ९४ टक्के तर सुशांत चव्हाण याला ८५ टक्के असे गुणांकन मिळून घवघवीत यश मिळाले. हे यश मिळाल्यानंतर आपणास यापुढे अथक परिश्रम करून डॉक्टर बनायचे असल्याचे मनोदय व्यक्त केले असून ते आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई बाबांना व वर्ग शिक्षकांना देत आहे. या यशामुळे त्यांच्या सन्मानार्थ अनेक ठिकाणावर बोलविल्या जात असून नुकतेच यवतमाळ येथिल फिजिक्स वालाह अकॅडमी तर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात सत्कार करण्यात आला. ही जिगरी जोडी सर्वांचे मन ओढावून घेत असून त्यांनी मिळविलेल्या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.