
यवतमाळ व अमरावती विभागात महाराष्ट्र कलार-कलाल समाज संघटनेच्या विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माननीय सागरभाऊ समुद्रवार, रवींद्र हटवार व कंबरवार साहेब यांच्या नेतृत्वात डॉक्टर गणेश नाईक यांची यवतमाळ-अमरावती विभागीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे गणेश भाऊ महादेवराव कोसरकर यांची यवतमाळ जिल्हा संघटक, नितीन भाऊ दत्तूजी मेश्राम यांची जिल्हाध्यक्ष, तर नितीनभाऊ उके यांची जिल्हा उपाध्यक्ष पदावर निवड झाली आहे.
या सर्व नियुक्त्यांचे महाराष्ट्र कलार-कलाल समाज संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.
संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी अशोकराव कावरे, राजेंद्र भाऊराव शेंडे, सुरेश पटले, सचिन भाऊ कावरे, राजू मानकर, सागर पटले, सचिन सुरसाउत, अजय कोसरकर, संजय शेंडे, संतोष शेंडे, रोहित कोसरकर, अजय मानकर, सचिन झगेकर व सुधीर सुरसाउत यांनी आपल्या भावना व्यक्त करत नव्या पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ही नवीन नियुक्ती समाज संघटनेच्या कार्यात नवचैतन्य निर्माण करेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.












































