
यवतमाळ / ढाणकी – गुप्तधन मिळविण्याच्या लालसेने अगदी घराशेजारी असणाऱ्या नातेवाईक स्त्रीवर अतिशय अत्याचार केल्याची घटना नुकतीच समोर आलेली असून गुप्तधनासाठी एका स्त्रीवर अन्याय, अत्याचारच नाही तर गाव सोडण्यासाठी भाग पाडणे तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडून तिला बदनाम करून घर विकण्यासाठी मजबूर करणाऱ्या लोकांवर आज पर्यंत कुठलीच कारवाई केल्या गेली नाही उलट पोलिसांचा सुद्धा या सर्व प्रकारात मोठा सहभाग असल्याची बतावणी होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, ढाणकी तालुका उमरखेड येथील शेतकरी कुटुंबातील दांपत्याने त्यांच्याच समाजातील व शेजारी असलेल्या या प्रकरणातील आरोपी
वनिता गणत हिंगे , अजय गणपत हिंगे , विजय गणपत हिंगे , अविनाश गणपत हिंगे , शोभाबाई तुकाराम भागवतकर , मजुषा विजय हिंगे , गणपत हिंगे
पुनम विलास घोडे सर्व राहणार ढाणकी यांच्या विरोधात संबंधित पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार दाखल केली की, हिंगे कुटुंबामध्ये गुप्तधन सापडल्याची चर्चा ढाणकीकरांना परिचित आहे आणि त्यातच यातील आरोपी यांनी तक्रारदार सौ काळे यांना त्यांचे राहते घर गुप्तधन काढण्यासाठी जास्त पैसे देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केला परंतु राहते घर त्यांना विकायचे नव्हते, आणि त्याकरिता त्या स्त्रीला गावातून बाहेर हाकलण्यासाठी व मजबूर होऊन घर विकण्यासाठी विविध प्रकारचे अन्याय अत्याचार त्या स्त्रीवर केले गेले. रात्री दरवाजे वाजवणे, तिच्या घरात घुसून सर्वांनी मिळून मारले,रात्री बे रात्री त्यांच्या घरी कोणत्याही परपुरुषाला पाठविणे, खोट्या तक्रारी,असे अनेक घाणेरडे प्रयोग केलेत व अजूनही सर्व प्रकार चालूच आहे. त्याचबरोबर त्या स्त्रीला वेश्या ठरविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला.
या सर्व त्रासाला कंटाळून त्या स्त्रीने जीवन संपवण्यासाठी घरात असलेल्या औषधाच्या गोळ्या सेवन केल्या पाच ते सहा दिवस उमरखेड सरकारी दवाखान्यात उपचारानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून घडलेली सर्व हकीगत सांगून तक्रार दिली परंतु पोलिसांनी कुठल्याही पद्धतीची ठोस कारवाई केली नाही. उलट आरोपींची बाजू घेऊन फिर्यादीलाच धमकावल्या गेलं.
सध्या ढाणकी आऊट पोस्टला कर्तव्यावर असलेले शिवाजी टीपूर्णे हे तक्रारदार यांच्या समाजाचे आहे त्यामुळे न्याय मिळेल या मोठ्या आशेने त्या स्त्रीने न्यायासाठी त्यांच्याकडे गेली असता शिवाजी टीपूर्णे या पोलीस अधिकाऱ्याने चक्क शरीर सुखाची मागणी केली.
शेवटी नाईलाजाने अन्याय अत्याचाराचा कळस झाल्यानंतर तसेच मानसिक प्रचंड दडपण व वाढत्या बदनामीमुळे सौ. काळे यांनी पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांना अतिशय गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी व गंभीर गुन्हे दाखल करून कारवाई न झाल्यास रीतसर आत्मदहनाची किंवा इच्छा मरणाच्या परवानगी करिता तक्रार दाखल केलेली आहे.












































