Home महत्वाची बातमी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाझेर काझी यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक ,

मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाझेर काझी यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक ,

523

 

मुंबई | दिनांक 3 मे २०२५ — आज मुंबईतील देवगिरी बंगल्यावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी साहेब यांनी सौजन्य भेट घेतली.

या भेटीत बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर सखोल चर्चा झाली. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, शेतकरी कल्याण, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील प्राधान्यक्रम ठरविण्याबाबत उपयुक्त चर्चा करण्यात आली.

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्ह्यातील संघटनात्मक कार्य अधिक बळकट करण्यासाठी गावपातळीवर संघटना विस्तार व युवकांना सक्रिय करण्याच्या दृष्टीने रणनीती आखण्यावरही भर देण्यात आला.

या बैठकीदरम्यान, अ‍ॅड. नाझेर काझी साहेब यांनी जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा व गरजांची माहिती उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडली, ज्यावर सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योग्य त्या उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले.