
महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे निर्मिती
यवतमाळ, ता. 22 : महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने (एमकेसीएल) पारंपरिक एमएससीआटी कोर्सला अद्ययावत करून नवीन ‘एमएस-सीआयटी- एआय पॉवर्ड’ कोर्सची रचना केली आहे.
एमएस सीआयटी कोर्स केवळ विंडोज्, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आणि इंटरनेटच्या वापरापुरता मर्यादित नाही, तर यात कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, डेटा विश्लेषण आणि क्लाउड कंप्युटिंगसारख्या नवयुगातील कौशल्यांचा समावेश केला आहे, अशी माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे जिल्हा समन्वयक मनीष हजारे यांनी दिली.
पुढे बोलताना श्री. हजारे म्हणाले, “दोन दशकांत १.६५ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी एमएससीआयटी कोर्स अनुभवलेला आहे. ‘एमकेसीएल’च्या महाराष्ट्रातील ४५०० हून अधिकृत अध्ययन केंद्रांद्वारे उद्दिष्टाची प्रभावी
अंमलबजावणी केली. डिजिटल डिव्हाईड कमी होत असतानाच एआय जाणणारे, न जाणणारे अशी दरी निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर, एआय डिव्हाईंड कमी करण्यासाठी एमकेसीएल पुन्हा सज्ज झाली असून एमएससीआयटी कोर्समध्ये शंभरपेक्षा अधिक उपयोगी एआय टुल्सची माहिती समाविष्ट केली आहे. चारशेहून अधिक स्किल्स विद्यार्थ्यांसाठी दिल्या आहेत.”
ते म्हणाले, “विद्यार्थी, गृहिणी, शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी, व्यावसायिक, स्टार्टअप सुरू करू इच्छिणारे, नोकरदार, नोकरी शोधणारे युवक/युवती, दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांनी, पालकांनी ही संधी न दवडता एमएस-सीआयटी एआय पॉवर्ड कोर्सची निवड करावी. महाराष्ट्रातील ४५०० पेक्षा अधिक केंद्रांवर, कॉम्प्युटर लॅब आणि प्रशिक्षकांबरोबर प्रवेश सुरू आहेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या केंद्राशी साधावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक मनीष हजारे, सचिन ढोबळे यांनी केले आहे.












































