
मुंबई / प्रतिनिधी – पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन ,प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा धाराशिव जिल्ह्याच्या पक्ष निरीक्षक सौ. सुप्रियाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 08 / 04 / 2025 रोजी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे पक्षात प्रवेश केला.
प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रमोद वाघमारे यांना आश्वासन दिले की सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीने महाराष्ट्र पोलीसांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील
प्रमोद वाघमारे यांच्या सोबत पोलीस बॉईज असोसिएशनचे मुंबई अध्यक्ष सय्यदराजा मुजावर , ठाणे जिल्हाध्यक्ष इम्रान मोमीन , यांचा देखील पक्ष प्रवेश झाला.













































