Home यवतमाळ बळी खैरे,मंगेश वरकड व चेतन देशमुख समता पर्वात पुरस्काराने सन्मानित…!

बळी खैरे,मंगेश वरकड व चेतन देशमुख समता पर्वात पुरस्काराने सन्मानित…!

491
यवतमाळ ( प्रतिनिधी ) – समतापर्व प्रतिष्ठान द्वारा आयोजित समता पर्व 2025 चे भव्य आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा दिमाखदारपणे समता मैदान यवतमाळ या ठिकाणी संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटकीय कार्यक्रमांमध्ये यवतमाळ येथील जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांना समता सेवा समर्पण पुरस्कार बहाल करण्यात आला. सत्यशोधक पुरस्कार चेतन देशमुख यांना देण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार बळी खैरे यांना सुद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रशासकीय क्षेत्रामध्ये मोलाची योगदान देणारे संतोष मनवर यांना समता पर्वा तर्फे गौरविण्यात आले.सदर पुरस्कार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. हर्षदीप कांबळे,प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग मुंबई महाराष्ट्र राज्य तसेच ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, मंगला मून आणि सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार रामटेके, डॉ. लीला भेले, डॉ. टी. सी. राठोड,नारायण थूल, ऍड रामदास राऊत, जनार्धन मनोहर, जितेंद्र ढाणके हेमंत कांबळे आकाश राठोड,त्याचप्रमाणे समता पर्वाच्या च्या मुख्य संयोजिका माधुरी वाळके, प्रमोदिनी रामटेके, एड. सीमा तेलंग, एड. भाग्यश्री खडसे यांच्यासह समता पर्व प्रतिष्ठान महिला आयोजन नियोजन समितीच्या सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होत्या.