Home महत्वाची बातमी धारदार शस्त्राने आईचा वार अन , मुलाचा खेळ खल्लास ,

धारदार शस्त्राने आईचा वार अन , मुलाचा खेळ खल्लास ,

626

 

अमीन शाह

दारू पिऊन भांडण करणाऱ्या मुलाची आईकडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील धावरी या गावात ही घटना घडली आहे. बालाजी राऊत असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे. दारूच्या नशेत असताना बालाजी राऊत या व्यक्तीकडून अनेकदा आई आणि पत्नीला जबर मारहाण करण्यात आली होती. दरम्यान, संतापाच्या भरात आईनेच आपल्या पोटच्या मुलाचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दारू पिऊन भांडण करणाऱ्या मुलाला वैतागून आईने आपल्याच मुलाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली आहे. तर हत्या करण्यात आलेल्या बालाजी राऊत यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादवरून भोकर पोलीस ठाण्यात आई नागाबाई राऊत हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी राऊत अनेक दिवसापासून दारू पिऊन कुटुंबाला त्रास देत होता या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी ही माहेरी निघून गेली होती. दारू पिऊन बालाजी राऊत आपल्या पत्नीला आणि आईलाच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत होता. इतकंच नाहीतर आईला मारहाणदेखील करत होता. या त्रासाला कंटाळून आईने आपल्या मुलाला संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.