Home यवतमाळ समता पर्व ही लोक चळवळ आहे – खा.प्रतिभा धानोरकर

समता पर्व ही लोक चळवळ आहे – खा.प्रतिभा धानोरकर

146

यवतमाल – समाजामध्ये आपसातील प्रेम बंधुभाव वाढवा फुले आंबेडकरांना अपेक्षित असलेली समता निर्माण व्हावी हा उदात्त उद्देश डोळ्यासमोर ठेवून गत वीस वर्षापासून सातत्याने मानवी मूल्ये रुजवणारी समता पर्व ही लोक चळवळ आहे,असे प्रतिपादन आर्णी वणी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.यवतमाळ आयडॉल च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,याच वैचारिक समूहाने मला खासदार बनवले हे कधीही विसरता येणार नाही.आज लोकशाही संकटात आहे ती वाचविण्यासाठी लोक जागृती करणे फुले आंबेडकरांचे मानवतावादी विचार लोकांपर्यंत पोहोचवणे ही आजच्या काळाची नितांत गरज आहे आणि हेच काम समता पर्व करते त्यामुळे समता पर्व या चळवळीची मौलिकता फार मोठी आहे असेही त्या म्हणाल्या
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेंद्र ढाणके प्रमुख अतिथी म्हणून अनिल आडे, समता पर्वाच्या आयोजक माधुरी वाळके मार्गदर्शक प्रमोदिनी रामटेके प्रवक्ता एड. सीमाताई तेलंगे ,विलास वानखेडे ,प्राचार्य अरुण शेंडे,डॉ.अस्मिता चव्हाण ,शुभांगी वाळके ,स्नेहा डोंगरे ,पल्लवी कांबळे ,रीना वानखेडे, प्रतिभा दातार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे संचालन विशाखा खोब्रागडे आणि विजयकुमार डोंगरे यांनी केले तर आभार कविता डोंगरे यांनी मांडले. लागलीच अभ्युदय अकादमी हैदराबाद तेलंगाना द्वारा संघम शरणम् गच्छामि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महानाट्य सादर करण्यात आले.या नाटकाने प्रेक्षकांचे मन जिंकले. यवतमाळतील रसिकांनी या नाटकाला भरभरून दाद दिली या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ नाटककार नारायण जाधव येळगावकर, मंगला मून,प्रस्तुत नाटकाचे दिग्दर्शक के.के. राजा हैदराबाद, विचारवंत प्रा. प्रवीण देशमुख,प्रदीप झाडे, नंदू बुटे, प्रा देविदास शंभरकर, एड.ज्योती जीवने नलिनी शहारे ,सुनिता बनसोड आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत कुमार कांबळे यांनी केले संचालन प्रा.पंढरी पाठे यांनी तर आभार ऍड. भाग्यश्री खडसे यांनी मानले.