Home विदर्भ दोन संशयास्पद व्यक्तींवर कारवाई

दोन संशयास्पद व्यक्तींवर कारवाई

203

देवळी – गौळ,(वार्ताहर) अंधाराचा फायदा घेऊन संशयास्पदरित्या वावरणाऱ्या दोन व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई अल्लीपूर पोलिसांनी टाकळी शिवारात केली. आदिलाबाद येथील झिशान खान फिरोज खान, पांढरकवडा येथील मोहम्मद जावेद मोहम्मद दस्तगीर हे दोघे एमएच २९ एडी ६५१ क्रमांकाच्या वाहनात मध्यरात्री अंधारात थांबून दिसले. पोलिसांनी त्यांना कारण विचारले असता समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. अंधाराचा फायदा घेत संशयीतरित्या मिळून आल्याने पोलिसांनी कारवाई केली.