
अमीन शाह
बुलडाणा ,
सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत रताळी येथील एका शेतातील डीपी जवळ एका व्यक्तीचा मृतदेह काल आढळून आला होता सदर व्यक्तीचा मृत्यू हा डीपी वर काम करीत असताना तो खाली पडल्याने डोक्याला जबर मार लागल्याने झाल्याचे उत्तरीय तपासणीवरून आढळून आले असल्याची अशी माहिती मिळाली असून रताळी येथील जावई म्हणून दोन वर्षांपूर्वी नारायण भाऊराव मैद वय ५० वर्ष हा रताळी गावात राहत होता. त्याला शेतीच्या कामाबरोबरच विजेचे कामही जमत होते. त्याच्या संशयस्पद मृत्यू झाल्यामुळें खुनाचा संशय वायकत करण्यात येत होता ,












































