Home यवतमाळ यवतमाळच्या प्रत्येक चौका – चौकामध्ये मटक्याचे काऊन्टर

यवतमाळच्या प्रत्येक चौका – चौकामध्ये मटक्याचे काऊन्टर

424

जिल्हा पोलीस अधीक्षकांचे अवैध व्यावसायिकाडे दुर्लक्ष…!

यवतमाळ : अवैध धंदे समुळ उच्चाटन करणे गरजेचे असताना यवतमाळ शहरातील चौका चौका मध्ये अवैध धंदे फोफावले आहे.यवतमाळ शहरातील शारदा चौकात जुगाराचा बाजार भरला आहे.त्याप्रमाणे अवधुतवाडी पोलीस स्टेशन च्या हद्दीत नगरपरिषद च्या बाजार मंडीत टिनपत्रे टाकुण थेट मटका जुगार खेळला जात आहे.तसेच रेल्वेस्टेशन परीसरात चार ठिकाणी मटका जुगार सुरू आहे. विशेष मध्ये या मटका जुगार चालविणारे शहरातील अट्टल गुन्हेगार आहेत.त्यामुळे या ठिकाणी भाईचा सध्या वावर आहे. सिंघानीया नगरात चार काऊंटर खुलेआम सुरू आहे. यवतमाळ शहर पोलीस स्टेशन अतर्गंत अप्सरा चौकातील गणेश चा जुगार चांगलाच फोफावला आहे. एसबीआय चौकात सुरू असलेल्या जुगारावर लाखोची उलाढाल होत आहे.त्याप्रमाणेच काॅटन मार्केट परीसरात सुद्धा दोन काऊन्टर आहे. तसेच यवतमाळ शहरात चौक चौकात 15 ते 20 मटका काऊंटर सुरू असुन या मटका काऊंटर ला अभय कुणाचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.गुन्हेगार व अवैध व्यावसायिकाचे समुळ उच्चाटन करण्याची गरज असताना गुन्हेगार मात्र गुन्हे करताना कोणताही मुलायजीला ठेवत नाही. यवतमाळात सुरू असलेल्या मटका काऊंटर ने अनेकांचा बळी गेला या जुगारात पट्टी लावुन जुगार खेळविला जातो यावर ठोस कारवाई करून कायम स्वरूपी मटका पट्टी बंद करण्यात यावी अशी मागणी सध्या सर्वत्र जोरधरत आहे .