Home यवतमाळ प्रेग्नंट माकडीणीच्या मृत्यूप्रकरणी वनविभागाच्या हलगर्जीपणाचा निषेध – जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी वनमंत्र्यांना निवेदन

प्रेग्नंट माकडीणीच्या मृत्यूप्रकरणी वनविभागाच्या हलगर्जीपणाचा निषेध – जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी वनमंत्र्यांना निवेदन

431

यवतमाळ (दि. 21 मार्च) –वीर वामनराव चौक परिसरात विजेच्या रोहित्रावर अडकलेल्या दोन माकडांना वाचवण्यासाठी एम.एच. 29 हेल्पिंग हॅन्ड वन्यजीव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून बचावकार्य केले. त्यातील एका माकडीणीची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीच्या वैद्यकीय उपचारांची आवश्यकता होती.मात्र,वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे वेळेत मदत न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ एम.एच.29 हेल्पिंग हॅन्ड वन्यजीव संघटनेचे अध्यक्ष निलेश मेश्राम, उपाध्यक्ष प्रज्वल तुरकाने,कॉम्रेड सचिन मनवर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज,दिनांक 21 मार्च,(शुक्रवार) रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत वनमंत्री यांना निवेदन दिले.
या निवेदनात रेंज फॉरेस्ट ऑफिसर अमर सिडाम यांच्यासह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात वन्यजीव उपचार केंद्राच्या तातडीच्या आवश्यकतेचा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला आहे.
वन्यजीव रेस्क्यू करणाऱ्या संस्थांना तात्काळ मदत मिळावी यासाठी सक्षम आणि ठोस कार्यप्रणाली तयार करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी,यवतमाळ यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल,असे आश्वासन दिले.
यावेळी संघटनेचे युवा प्रमुख शुभम तेलगोटे,कॉम्रेड सचिन मनवर,प्रा.पंढरी पाठे,जीवन तडसे,जुबेर मलनस,गट्टू भगत,बॉबी बगमारे, महेश शेळके,आदित्य गणवीर,अभिजीत वाघमारे,रवी वाईकर,चिन्मय आडे,सनी मुरारी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.