Home यवतमाळ प्रेग्नंट माकडीणीच्या मृत्यूप्रकरणी वनविभागाच्या निष्काळजीपणाविरोधात निवेदन जबाबदार अधिकारी सिडाम,व कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याची...

प्रेग्नंट माकडीणीच्या मृत्यूप्रकरणी वनविभागाच्या निष्काळजीपणाविरोधात निवेदन जबाबदार अधिकारी सिडाम,व कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी

382
यवतमाळ (दि.२० मार्च) –वीर वामनराव चौक परिसरात विजेच्या रोहित्रावर अडकलेल्या दोन माकडांना वाचवण्यासाठी एम.एच.२९ हेल्पिंग हॅन्ड वन्यजीव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून मदत केली.त्यातील एका माकडीणीची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी हलवण्याची गरज होती.मात्र,वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे वेळेत मदत न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.
या घटनेच्या निषेधार्थ प्रा.पंढरी पाठे व एम.एच.२९ हेल्पिंग हॅन्ड वन्यजीव संघटना,यवतमाळ यांच्या वतीने माननीय वनसंरक्षक व उपवनसंरक्षक यांना आज दिनांक २० मार्च रोजी निवेदन देण्यात आले.यात रेंज फॉरेस्ट ऑफिसर अमर सिडाम यांच्यासह जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी सहायक वनसंरक्षक निलेश सोनवणे यांनी घटनेची गंभीर दखल घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल,असे आश्वासन दिले.
सदर घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात वन्यजीव उपचार केंद्राच्या तातडीच्या आवश्यकतेचा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला आहे.वन्यजीव रेस्क्यू करणाऱ्या संस्थांना त्वरित मदत मिळावी यासाठी ठोस कार्यप्रणाली तयार करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
यावेळी प्रा.पंढरी पाठे,प्रज्वल तुरकाने,शुभम तेलगोटे,जुबेर मलनस,गट्टू भगत,कल्याणी बोरकर,बॉबी बगमारे,महेश शेळके,आदित्य गणवीर,अभिजीत वाघमारे,प्रतीक तरळकर,रवी वाईकर,चिन्मय आडे,सनी मुरारी,इत्यादी उपस्थित होते.
कोट—
“ही घटना दुर्दैवी आहे.वनविभाग वन्यजीव संरक्षणासाठी तत्पर आहे,आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल.संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून आवश्यक ती कारवाई केली जाईल.तसेच,यवतमाळ जिल्ह्यात वन्यजीव उपचार केंद्र सुरू करण्यासंदर्भात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्यात येईल.”
— (सहायक वनसंरक्षक -निलेश सोनवणे)
“वन्यजीव संरक्षण हे केवळ कायद्याने नव्हे,तर जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने होणे गरजेचे आहे.वनविभागाच्या दुर्लक्षामुळे एका निरपराध प्राण्याचा जीव गेला.भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून वनविभागाने तत्काळ वन्यजीव उपचार केंद्र सुरू करावे आणि रेस्क्यू करणाऱ्या संघटनांना त्वरित मदत मिळेल यासाठी ठोस कार्यपद्धती लागू करावी.”
— प्रा.पंढरी पाठे (कृषी तथा वन्यजीव अभ्यासक,यवतमाळ)