Home महत्वाची बातमी विनायक सरनाईकांसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा रात्रीचा मुक्काम चिखली पोलिस स्टेशनलाच…

विनायक सरनाईकांसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा रात्रीचा मुक्काम चिखली पोलिस स्टेशनलाच…

525

 

रविकांत तुपकर मात्र आंदोलनावर ठाम… असंख्य कार्यकर्ते गनीमी काव्याने मुंबईत दाखल…

एकनाथ माळेकर

चिखली — रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मुंबई येथे होऊ घातलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चिखली पोलीसांनी तुपकरांचे खंदे समर्थक विनायक सरनाईक यांच्यासह भारत वाघमारे,भगवान मोरे, सतिष सुरडकर,रवि टाले,भारत गाढवे,प्रल्हाद देव्हढे,अमोल पवार यांच्यासह आदिंना सकाळी भल्या पहाटे 5 वाजताच घरुण ताब्यात घेतले होते.रायपुर पोलीसांनी सुधाकर तायडे, गजानन पंडीत अमडापूर पोलीसांनी संतोष खडसे,विठ्ठल चौथे,आकाश राऊत,अमोल तोंडे यांच्यासह आदिंना ताब्यात घेतले होते.असीच कारवाई अंढेरा व जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन कडून करण्यात आली होती.मात्र रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम असल्याने अनेक कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहे.

रात्रीचे 11वाजले तरी सुद्धा एक कार्यकर्त्याची सुटका झाली नसून सकाळी झोपेतून उठवून पकडलेल्या कार्यकर्ते यांचा मुक्काम पोलीस स्टेशनलाच होणार आहे ,
सिंदखेडराजा तहसिल मधील आंदोलनामुळे वातावरण पेटले असून उद्या रविकांत तुपकर मुंबईत जरी आंदोलन करणार असली अनेक कार्यकर्ते जिल्ह्यात आंदोलन करणार असल्याच्या भुमिकेत दिसुन येत आहे