Home यवतमाळ यवतमाळ PWD कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर – झिम्मा व्यायामावर वादंग

यवतमाळ PWD कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर – झिम्मा व्यायामावर वादंग

410
यवतमाळ, सिव्हिल लाईन्स: सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) च्या सिव्हिल लाईन्स परिसरात सकाळी 6 ते 8 या वेळेत काही स्त्रिया झिम्मा या नृत्याच्या माध्यमातून व्यायाम करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, हा प्रकार शासकीय कार्यालयाच्या आवारात होऊनही त्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अधिकृत परवानगीशिवाय शासकीय कार्यालयात झिम्मा
PWD कार्यालय हे महत्त्वाचे शासकीय ठिकाण असून, तेथे विविध गोपनीय दस्तऐवज असतात. मात्र, कोणतीही परवानगी न घेता महिलांचा हा झिम्मा उपक्रम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी बाहेरील व्यक्ती मुक्तपणे ये-जा करत असल्याने सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुरक्षेचा अभाव – संभाव्य धोके
याच परिसरात अनेकदा चोरीच्या घटनांची नोंद झालेली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये सुरक्षा ही अत्यावश्यक बाब असते, मात्र येथे दिवसाढवळ्या कोणीही प्रवेश करू शकते. विशेषतः कार्यालयाच्या आवारात प्रेमी युगुल बिनधास्त वावरताना दिसत असून, काही जण आपल्या वासना तृप्त करण्यासाठी या परिसराचा गैरफायदा घेत असल्याच्या तक्रारी आहेत.
PWD प्रशासन गप्प का?
सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही शासकीय कार्यालयाच्या परिसरात सुरक्षा रक्षक किंवा CCTV कॅमेरे कार्यरत नाहीत, हे आश्चर्यकारक आहे. जर या परिसरात एखादी अनुचित घटना घडली, चोरी झाली किंवा महत्त्वाच्या दस्तऐवजांवर आघात झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
तपास व कारवाईची मागणी…
संबंधित अधिकाऱ्यांनी या झिम्मा उपक्रमाची चौकशी करावी.
शासकीय कार्यालयाच्या आवारात कोणत्याही प्रकारच्या विनापरवानगी कार्यक्रमांना बंदी घालावी.
परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना जसे की CCTV कॅमेरे, सुरक्षा रक्षक तैनात करावेत.
बाहेरील अनोळखी लोकांची ये-जा नियंत्रित करावी.PWD कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून, प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच योग्य तो निर्णय घ्यावा, अशी स्थानिक नागरिक व कर्मचाऱ्यांची मागणी आहे.