Home मुंबई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सभागृहात जाहीर केले की सर्व सामान्य जनतेला...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सभागृहात जाहीर केले की सर्व सामान्य जनतेला परवडणार्या दरात घरे देणार यात मुंबईच्या डबेवाला कामगार यांचा ही उल्लेख त्यांनी केला.

364

डबेवाला कामगार २५ लाख रूपये आणनार कोठून ?

सुभाष तळेकर ( अध्यक्ष )

मुंबई डबेवाला असोशिएशन.
————————————–
मुंबई – अनुराग पवार  – गेली १३५ वर्ष मुंबईत जेवणाचे डबे पोहचवणारा डबेवाला आर्थीक क्षमता नसल्या मुळे मुंबईत आपले हक्काचे घर घेऊ शकला नाही. त्या मुळे बहुतांश डबेवाल्यांना मुंबईत आपले स्व:ताचे घर नाही बरेचसे डबेवाले हे झोपडपट्टीत, भाड्याच्या खोलीत,गावकीच्या खोलीत, मंडळाच्या खोलीत रहात आहेत. या डबेवाल्यांना सरकारने परवडणार्या दरात घरे उपलब्द करून देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज त्यांचे निवासस्थानी डबेवाला कामगार शिष्ट मंडळा सोबत एक बैठक आयोजीत केली होती त्या बैठकीत यांनी डबेवाल्यांच्या घरांची अनेक वर्षांपासूनची हक्काची मागणी पुर्ण केली. दिवे अंजनगाव, ठाणे येथे ४६ एकर जागेत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १२,००० घरे मंजूर करण्यात आली आहेत. या प्रकल्पासाठी लागणारी सर्व प्रक्रिया म्हाडा मार्फत पूर्ण केली जाणार असून, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यासाठी शासनातून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
सदर गृहप्रकल्प पब्लिक-प्रायवेट पार्टनरशिप तत्वावर करण्यात येणार असून, डबेवाल्यांना ५०० चौ. फुटांची ५००० घरे देण्यात येणार आहे. त्यांची किंमत २५ लाख रूपये ठेवली गेली आहे.
आपल्या मेहनितीच्या व चिकाटीच्या जोरावर डबेवाल्यांचा गैर सरकारी व्यवसाय अजुन ही मराठी माणसांच्या हातात आहे. डबेवाले गेली १३५ वर्षे ही सेवा अविरतपणे मुंबईत देत आला आहे त्याची या सेवेची दखल विषेश करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली व डबेवाला कामगार यांना मुंबईत परवडणार्या दरात घरे देण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्या बद्दल “ मुंबई डबेवाला असोशिएशन” त्यांचे आभारी आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवडणार्या दरात घरे देणार असे जाहीर केले. मुख्यमंत्री महोदया कडे “ मुंबई डबेवाला असोशिएशन” मागणी करत आहे की मुंबईत १३५ वर्ष डबेवाला काम करतो आहे तेव्हा आजी/ माजी डबेवाला कामगार किंवा कामगार मृत पावला असेल तर त्यांचे वारसाला मुंबईत घर देण्यात यावे.
तसेच आमची सरकारला विनंती आहे की डबेवाला कामगार यांचे मासिक उत्पन्न तुटपुंजे आहे साधारणता १५ ते २० हजार रूपये त्याचे मासिक उत्पन आहे. मग या उत्पन्नावर डबेवाला कामगाराला कोणती बॅन्क २५ लाख रूपये घरासाठी कर्ज देऊ शकत नाही. त्या मुळे डबेवाला कामगाराचे घर घेणे हे दिवा स्वप्न ठरणार आहे. कारण
“अल्प उत्पन्न” गटा पेक्षाही डबेवाला कामगार त्याचे मासिक उत्पन्न कमी आहे. तो २५ लाख रूपयाचे घर घेऊ शकत नाही.
डबेवाला कामगार यांचा समावेश “अल्प उत्पन्न” गटात करावा व त्यांना साधारणता दहा/बारा लाखात मुंबईत घरे उपलब्द करून दिली जावीत, ते पैसे भरण्यासाठी बॅन्केतून सुलभ हप्त्यावर गृहकर्ज उपलब्द करून दिले पाहीजे. जर असे झाले तर डबेवाल्यांचे मुंबईत आपले स्व:ताच्या हक्काचे घराचे स्वप्न पुर्ण होईल. किंवा गिरणी कामगारांना ज्या प्रमाणे मुंबईत घरे दिली त्या धर्तीवर डबेवाला कामगार यांना मुंबईत घरे दिली जावीत अशी मागणी “ मुंबई डबेवाला असोशिएशन” च्या वितिने सरकारला करतण्यात येते आहे या बाबतचे निवेदन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून देण्यात येईल. डबेवाला कामगारांन बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायम आस्था राहीली आहे त्या मुळे गेली २० वर्ष डबेवाला कामगार यांच्या घरांचा प्रलंबित असलेला प्रश्न त्यांचे कार्य काळात मार्गी लागेल अशी आशा डबेवाला कामगाराला आहे.