Home यवतमाळ पठाणी वसुली व सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरविणाऱ्या ” त्या ” अधिकाऱ्यावर वरदहस्त कोणाचा…!

पठाणी वसुली व सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरविणाऱ्या ” त्या ” अधिकाऱ्यावर वरदहस्त कोणाचा…!

660

ढाणकी ( प्रतिनिधी )

उमरखेड – पोलीस विभागातील एका कर्मचाऱ्यामुळे अवैध व्यावसायिकाकडून पठाणी वसुली व सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत पसरलेली आहे. सट्टा, जुगार, मनी लॉन्ड्रीग, चोरीच्या गाड्या, रेती तस्कर, जुगार क्लब, इत्यादी अनेक अवैध धंदे शहरात फोफावलेले असून या सर्व प्रकाराला सध्या कर्तव्यावर असलेले एकमेव पोलीस कर्मचारी जबाबदार असून कायदा व सुव्यवस्था न मानणाऱ्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर नेमका वरदहस्त कोणाचा असा सवाल जनतेमध्ये निर्माण झालेला आहे.
सविस्तर वृत्त असे की, सध्या ढाणकी शहरात कॅनॉलच्या रोडवर एका शेतात खुलेआम जुगार अड्डा /क्लब चालू असून ह्या जुगार अड्ड्याचा पडद्यामागील मालक हा सध्या ढाणकी आऊट पोस्ट पोलीस स्टेशनला कर्तव्यावर असून खुलेआम अवैध धंदे करीत असून “पैशांसाठी वाटेल ते ” अशी स्पष्ट भूमिका बजावत असून रात्री रेती तस्करांना अक्षरशः लुटतो अशी प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या गावकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनलेला आहे.
विश्वासनीय सुत्रा कडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या पोलीस स्टेशनला सतत अवैध व्यावसायिकांची “सेटलमेंट” करिता ये जा चालू असते. अनेक अवैध व्यवसाय चालू करण्याकरिता “हप्ता रुपी पॉकेट” साहेबांकडे दिल्याशिवाय रीतसर परवानगी मिळतच नाही. एखाद्याची तक्रार, किंवा एखादा चुकून साहेबांच्या हाती लागला तर साहेबां साठी पर्वनीच समजावी.उर्वरित शेवटचे तीन महिने पोत्याने पैसा जमा करून नेण्याचा साहेबांचा मानस आहे.
या सर्व प्रकारामुळे ढाणकी परिसरात दहशतीचे वातावरण पसरलेले असून त्यांच्या विरोधात निनावी तक्रारी सुद्धा वरिष्ठांकडे केलेल्या असून याकडे वरिष्ठांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केलेली आहे. अतिशय महत्त्वाचे म्हणजे हनुमंतराव गायकवाड ह्या पोलीस अधिकाऱ्यावर संशय व्यक्त केल्या जात आहे.
या संदर्भात पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी व कारवाई केली नाही तर सर्व पत्रकार संघटना तसेच सजग नागरिक एकत्र येऊन आंदोलन करणार असल्याचे सुद्धा ऐकिवात असल्यामुळे यापुढे ” त्या “अधिकाऱ्यावर कारवाई होईल का असा सवाल त्रस्त झालेले नागरिक करित असून या गंभीर विषयावर तात्काळ निर्णय घेण्याची सक्त गरज आहे.
अमोल कोमावार ( व्हिसलं ब्लोअर ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचेकडून तात्काळ कारवाईची अपेक्षा आहे.