Home पुणे “यवतमाळचा अभिमान” भारतीय छात्र संसदेत यश चव्हाण ‘बेस्ट स्टुडंट स्पीकर’ पुरस्काराने सन्मानित

“यवतमाळचा अभिमान” भारतीय छात्र संसदेत यश चव्हाण ‘बेस्ट स्टुडंट स्पीकर’ पुरस्काराने सन्मानित

358

पुणे – विद्येच्या माहेरघर असलेल्या पुण्यात आयोजित भारतीय छात्र संसद २०२५ मध्ये यवतमाळच्या यश मंजुश्री किशोर चव्हाण याने आपल्या प्रभावी वक्तृत्वाने सर्वांना मोहित करत ‘बेस्ट स्टुडंट स्पीकर’ पुरस्कार पटकावला.या संसदेचे आयोजन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी,पुणे यांच्या वतीने ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले होते.

देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून झाली २४ जणांची निवड—
देशभरातील नामांकित विद्यापीठांमधून ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या छात्र संसदेच्या स्पर्धेत भाग घेतला.त्यामधून अंतिम टप्प्यासाठी २४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.यश चव्हाण हा या २४ विद्यार्थ्यांपैकी सर्वांत कमी वयाचा स्पर्धक होता आणि त्याने महाराष्ट्राचे नेतृत्व केले.

‘रेवडी संस्कृती: आर्थिक भार की आवश्यक आधार’ – प्रभावी सादरीकरणाने मिळवले सर्वांचे लक्ष!
यशने ‘रेवडी संस्कृती: आर्थिक भार की आवश्यक आधार’ या महत्त्वाच्या विषयावर प्रभावीपणे आपले विचार मांडले.त्याच्या प्रखर तर्कशुद्ध मांडणीने उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षक प्रभावित झाले.संपूर्ण कार्यक्रम ऐकण्यासाठी देशभरातून ६,००० हून अधिक लोकांनी उपस्थिती दर्शविली होती.

देशभरातील नामवंत नेत्यांच्या उपस्थितीत गौरव!
या कार्यक्रमाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर उपस्थित होते.यामध्ये रवींद्र नाथ महतो झारखंड विधानसभा अध्यक्ष,थॉमस ए.संगमा अध्यक्ष,मेघालय विधानसभा,पवन खेरा अध्यक्ष,मीडिया आणि प्रचार विभाग,काँग्रेस कार्यकारिणी सदस्य,राहुल कराड कार्यकारी अध्यक्ष,एमआयटी डब्ल्यूपीयू आणि संस्थापक,MIT-SoG, BCS, मलाच,डॉ.आर.एम.चिटणीस कुलगुरू,एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी,ईत्यादी.

यश चव्हाणचे यश – नव्या पिढीला प्रेरणा!
यश चव्हाणच्या वक्तृत्वकौशल्याने आणि तल्लख बुद्धीने संपूर्ण स्पर्धेत लक्ष वेधून घेतले आणि त्याला ‘बेस्ट स्टुडंट स्पीकर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.त्याच्या या यशामुळे यवतमाळ जिल्ह्याचा सन्मान वाढला असून,संपूर्ण महाराष्ट्रासाठी तो अभिमानाचा क्षण ठरला आहे.