
अमीन शाह
पुणे शहरातील मध्यवस्तीत असलेल्या नामांकीत शाळेतील महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे.
27 वर्षीय शिक्षिकेने दहावीमध्ये शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. खडक पोलिसांनी या शिक्षिकेला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंज पेठेतील नामांकित शाळेच्या आवारात घडलेला हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलगा हा शुक्रवारी शाळेत दहावीच्या प्रिलियम परीक्षेसाठी आला होता. आरोपी शिक्षिकेने पीडित विद्यार्थ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
तसेच त्याला तिच्यासोबत शाळेच्या आवारातच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. ही माहिती मिळाल्यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने संबंधित शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिला अटकही करण्यात आली.
या ठिकाणी वरिष्ठ पोलिसांनी भेट दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक तोंडे करत आहेत. या याप्रकरणी संबंधित शिक्षिकेवर पोलिसांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पॉक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.












































