Home बुलडाणा सोमेश इंगळे यांना उत्कृष्ट डिजिटल फोटोग्राफी साठी कला गौरव पुरस्कार जाहीर ,

सोमेश इंगळे यांना उत्कृष्ट डिजिटल फोटोग्राफी साठी कला गौरव पुरस्कार जाहीर ,

340

 

शून्यातून निर्माण केलं फोटोसेशनचं विश्व ,

मॉडेलिंग डिजिटल फोटोग्राफी मध्ये केले गावाचे नाव रोशन ,

अमीन शाह

सिंदखेडराजा ,

: दैनिक भारत संग्राम “आयोजित स्वर्गीय मधुकर खंडारे यांच्या “स्मृतिपितर्थ” व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच समाज भूषण अर्जुन गवई यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय पुरस्कार “सोहळा 2024 25 आयोजीत करण्यात आला आहे. दरवर्षी त्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या आयोजित कार्यक्रमात सोमेश इंगळे यांना उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी कला गौरव
पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक सचिन खंडारे यांनी दिली आहे.

साखरखेर्डा सारख्या छोट्या शहरातून छोट्या ठिकाणी 2000 साली आपल्या फोटोग्राफी व्यवसायाला सुरुवात करून आज साखरखेर्डा सारख्या शहरात सोमेश डिजिटल फोटो स्टुडिओ च्या दोन मुख्य शाखा सोमेश इंगळे यांच्या असून अनेक मुलांना त्यांनी फोटोग्राफी चे शिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिले आहे. अनेक गरीब तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात ते यशस्वी ठरले आहे.
प्रत्येक लग्न कार्यात सोमेश इंगळे यांचा सर्वात प्रथम विचार केला जातो
आज रोजी त्यांच्या कडे जिल्हा च्या बाहेरून देखील फोटोग्राफी साठी ग्राहक व विद्यार्थी येत असतात. मागील 24 वर्षात या सोमेश डिजिटल फोटोने उच्चांक गाठला आहे. आणि केवळ साखरखेर्डा शहरातच नव्हे तर संपूर्ण सिंदखेडराजा तालुक्यातील लोक त्यांच्या फोटोग्राफी ला पसंती देत आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना ३० डिसेंबर २०२४ रोजी साखरखेर्डा येथे होणाऱ्या या भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते सोमेश इंगळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.