Home यवतमाळ सख्ख्या मामानेच फसवणूक करून भाच्यांची शेती केली नावावर

सख्ख्या मामानेच फसवणूक करून भाच्यांची शेती केली नावावर

652

उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी राळेगाव यांचेकडे खरेदी रद्द करण्यासाठी केली मागणी

यवतमाळ – कळंब तालुक्यातील मौजा मांजरवघळ येथील वडिलोपार्जित असलेले शेत गट नं. ५ ही शेत जमीन अर्जदार रामकृष्ण गुणवंतराव डंभारे (मुलगा), सविता संदीप बोंदरे (मुलगी) व कविता विनोद पत्रे (मुलगी) यांना आजोबांपासून वडीलोपार्जीत शेतजमीन मांजरवघळ येथे असून अर्जदारांना वारस हक्काने प्राप्त झाली आहे. मात्र वडीलांचे निधनानंतर अर्जदारांचे आईचे नावावर असतांना मामा धनराज झोलबाजी पाटील यांनी तलाठ्याला हाताशी धरुन दिनांक २ ऑगस्ट २०२४ रोजी बोगस कागदपत्रे करुन शेत खरेदी करुन घेतल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.
कळंब तालुक्यातील मांजरवघळ येथे रामकृष्ण गुणवंतराव डंभारे यांची आजोबा पासून वडिलोपार्जित गट नंबर ५ शेतजमीन असून वारसाहक्काने वडिलांचे निधनानंतर आईचे नावाने करण्यात आली होती. मात्र अर्जदार तीघे बहिण भाऊ असून त्यांच्या आईला कॅन्सर झाला असल्याने त्यांच्या आईला केमोथेरपी साठी नागपूर हॉस्पिटल मध्ये घेऊन जात होते. त्यावेळी त्यांच्या मामाने केमोथेरपीसाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळेल असे सांगून आमच्या सह्या व आधारकार्ड घेतले. त्यावेळी कुठलेही कागद पत्रे वाचू दिले गेले नाही. आईच्या निधनानंतर वडिलोपार्जित जमीनीवर मामांनी चुकीच्या पद्धतीने खरेदी केली आणि सातबारा उताऱ्यावर त्यांच्या नावाने फेरफार केला गेला आहे. तेंव्हा संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करुन चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली खरेदी रद्द करावी, बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलेल्या सातबारा उताऱ्यावरील फेरफार रद्द करावा, फिर्यादीची वडिलोपार्जित शेत जमीन परत मिळावी. अशा प्रकारची तक्रार अर्जदार रामकृष्ण डंभारे, सविता बोंद्रे, कविता पत्रे यांनी २४ डिसेंबर २०२४ रोजी उपविभागीय अधिकारी राळेगाव व तहसीलदार कळंब यांचेकडे केली.