Home बुलडाणा आमदार मनोज कायंदे यांचा एक फोन आणि शेतकऱ्यांच्या उदास चेहेऱ्यावर फुलले हास्य...

आमदार मनोज कायंदे यांचा एक फोन आणि शेतकऱ्यांच्या उदास चेहेऱ्यावर फुलले हास्य ,

291

 

 

अमीन शाह

सिंदखेडराजा ,

शेतकरी राजा कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच अडचणीत असतो कधी पाऊस मुळे तर कधी निसर्गाच्या लहरीपणा मुळे नेहमी शेतकरी संकटात सापडतो मात्र सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का गावा मध्ये गेल्या एक वर्षापासून शेतातील डीपी बंद अवस्थेमध्ये होती म्हणून शेतकऱ्याचे खरीपचे पीक तर गेलेच पण रब्बीचे पीक सुद्धा हातामधून जाणार असल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले होते म्हणून
येथील शेतकर्यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार मनोज कायंदे यांची भेट घेतली व त्यांना सगळ्या समस्या समजाउन सांगितल्या शेतात विहरीना मुबलक प्रमाणात पाणी तर आहे मात्र वीज बंद असल्यामुळे रब्बी पीक हातातून जाणार आहे असे सांगितल्या नंतर लगेच त्यावर त्यांनी आमदार मनोज कायदे यांनी विधुत महावितरण अधिकाऱ्यांना फोन लावून शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या व सूचना देऊन पळसखेड चक्का तालुका सिंदखेड राजा येथील डीपी ताबडतोब बसवा असे आदेश दिल्यानंतर आज लगेच येथे नवीन डीपी बसवण्यात आली त्यामुळे येथील शेतकऱ्यात आनंद व्यक्त करण्यात आला ,
आमदार साहेबांची कार्यतत्परता पाहून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे शेतकरी योद्धा कृती समिती चे समन्वय श्री बालाजी सोसे, श्री अर्जुन मुंडे साहेब, श्री गणेश सोसे ग्रामपंचायत सदस्य, पांडुरंग सोसे, प्रमोद नागरे, राहुल आंधळे, धनंजय सोसे, व इतर शेतकऱ्यांनी आमदार साहेबांचे आभार वायकत केले आहे ,