
जनतेमध्ये मोघे यांच्याकडे आश्वासक चेहरा म्हणुन पाहिल्या जात असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वास
यवतमाळ / ( हरीश कामारकर)
आर्णी – केळापूर विधानसभा मतदार संघाची जागा महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष असलेला काँगेसच लढणार असुन त्यासाठी जन सामान्यांच नेतृत्व जितेंद्र मोघे हेच उमेदवार असणार असल्याची काँग्रेसमध्ये चर्चा आहे.
आर्णी विधानसभेचे ॲड.शिवाजीराव मोघे यांनी प्रतिनिधित्व करून या मतदार संघातील आर्णी,घाटंजी,केळापूर तालुक्यातील नागरीकांच्या समस्या सोडवून मतदार संघाचा विकास केला आहे.तसेच या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत असतांनाच राज्यात सामाजिक न्यायमंत्री म्हणुन आपली चमकदार कामगिरी राज्याला दाखवुन दिली आहे.त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून आर्णी मतदार संघातील जनतेच्या सोयीसाठी पांढरकवडा येथे उपविभागीय कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आणि प्रकल्प कार्यालयं आणले, गाव खेड्यात रस्ते,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, विविध विकास कामे केली,आरोग्य सेवा यांसह शिक्षणाच्या संधी निर्माण करून सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले आहेत.आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आर्णी विधानसभा निवडणूक काँग्रेसच लढणार असल्याने त्यासाठी युवा नेते जितेंद्र मोघे हेच उमेदवार राहणार असल्याचा ठाम विश्वास कार्यकर्त्यांना आहे.कारण जितेंद्र मोघे हे मागील दशकापासून मतदार संघाच्या राजकारणात सक्रिय झाले असुन त्यांनी मतदार संघात आपला जनसंपर्क वाढवून नागरीकांच्या अडी अडचणीत धावुन जात मदत करणे, दुर्धर आजार ग्रस्त रुग्णांना उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करवून घेणे,शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अनेक मोर्चे ,आंदोलने केली आहेत आर्णी, केळापूर (पांढरकवडा),घाटंजी नगर परिषदेवर काँग्रेस व मित्र पक्षाच्या आघाडीची सत्ता येण्यासाठी त्यांनी विशेष कार्य केले आहे. यंदाच्या निवडणुकीत विद्यमान खा.प्रतिभाताई धानोरकर यांच्या विजयासाठी स्वतः जितेंद्र मोघे यांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेत मायबाप जनतेला साद घालत मतांचा जोगवा मागुन प्रतिभाताईंना प्रचंड मताधिक्य मिळवुन दिले आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात अग्रस्थानी राहून जितेंद्र मोघे तो यशस्वी करण्यात त्यांचा वेगळाच हातखंडा असल्याने प्रत्येक नागरिकांना आपलेसे वाटणारे नेतृत्व म्हणुन जितेंद्र मोघे यांच्याकडे पाहिले जात आहे. त्या मानाने विरोधी पक्षांकडे त्यांच्या तोडीचा एकही उमेदवार नसल्याने व माजी आ.राजु तोडसाम यांनी अनेक पक्षांच्या वाऱ्या केल्याने यंदा कोणत्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढायची तसेच जनता आपल्याला स्वीकारणार का?या द्विधा मन:स्थितीत सापडले आहेत त्यामुळे आर्णी विधान सभेचा गड पुन्हा काँग्रेसकडे खेचुन आणण्याची मोहीम आपल्या नेतृत्व गुणाच्या तसेच मायबाप मतदारांच्या आशिर्वादाच्या जोरावर जितेंद्र मोघे यशस्वी करतील तसेच मागील दशकापासून सत्ताधारी आमदारांच्या निष्क्रियतेमुळे मतदार संघ विकास पासुन कोसोदुर लोटल्या गेला आहे.त्यामुळे मतदार संघाचा विकास करून गत वैभव आणि प्राप्त करून देण्याचे काम जितेंद्र मोघेच करू शकतात असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत आहे.त्यामुळे त्यांना याठिकाणी एकदा संधी देण्यात यावी अशी सुद्धा मागणी करण्यात येत आहे.
####चौकट ###
भाजप सोबत असणार मुख्य लढत..
मागील दोन निवडणूकीत काँग्रेसला धोबीपछाड देण्यास याठिकाणी भाजपा यशस्वी ठरली. यामध्ये २०१४ साली प्रा. राजु तोडसाम तर २०१९ ला डॉ. संदिप धूर्वे यांनी या मतदारसंघावर प्रतिनिधित्व केलें. मात्र या कार्यकाळाचा विकासात्मक आलेख पाहता भाजपची कामगिरी दमदार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता भाजपा कोणती नवी खेळी खेळून आणि कोणता चेहरा सामोरं करुन निवडणूकीत उतरते हे महत्वाचे आहे.












































