Home महत्वाची बातमी अवांतर खर्च टाळत लोकोपयोगी कार्यक्रमाने वाढदिवस साजरा…

अवांतर खर्च टाळत लोकोपयोगी कार्यक्रमाने वाढदिवस साजरा…

27

यवतमाळ – वाढदिवसानिमित्त कुठल्याही चैनीच्या गोष्टींवर खर्च न करता विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवित सामाजिक कार्यकर्ते अनुराग गावंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे तब्बल ६५ नवजात शिशूंना ड्रेस किट तसेच स्व. देवराव पाटील विद्यालय येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बिपिनभाऊ चौधरी, प्रज्वल हूड,आकाश भारती,अक्षय हांडे,शुभम वानखेडे,गौरव राऊत,शुभम जांभुळकर,हितेश वगैरे,आशुतोष थेटे,संकेत हुड ,आर्यन कावलकर,राजू मदनकर ,विनीत पटेल यांच्यासोबत शाळेतील शिक्षक भटकर सर,मलनस सर,राठोड सर आदी उपस्थित होते.