Home बुलडाणा अधिकाऱ्याची एसटी वाहक महिलेकडे शरीर सुखाची मांगणी .

अधिकाऱ्याची एसटी वाहक महिलेकडे शरीर सुखाची मांगणी .

145

 

अमीन शाह

बुलडाणा ,

राज्य परिवहन मंडळाच्या लाईन चेकिंग अधिकाऱ्याने एसटीच्या एका वाहक महिलेकड शरीर सुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सदर अधिकाऱ्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खामगाव एसटी आगारात कार्यरत असलेल्या एका ३८ वर्षीय वाहक महिलेला मागील काही दिवसांपासून परिवहन महामंडळाचा लाईन चेकिंग अधिकारी विजय पवार हा त्रास देत होता तो सदर वाहक महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत होता आज त्याच्या विरुद्ध दाखल तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.