Home पालघर एस.पी. मोटर्स शोरूमचे विक्रमगड मधे पुष्पलता पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

एस.पी. मोटर्स शोरूमचे विक्रमगड मधे पुष्पलता पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

187

जव्हार :-सोमनाथ टोकरे

पत्रकारांनी पत्रकारिता करताना व्यवसायामध्ये उतरले तरच प्रामाणिकपणे पत्रकारिता करता येते आणि व्यवसायाचीही भरभराट होते , याचे उत्तम उदाहरण म्हणजे पत्रकार शरद पाटील. त्यांचा आदर्श घेऊन पत्रकारांनी पत्रकारितेबरोबरच व्यवसायामध्येही उतरावे , असे प्रतिपादन कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी विक्रमगड येथे केले.
विक्रमगड ते पत्रकार शरद पाटील यांच्या एस.पी. मोटर्स इलेक्ट्रिक बाईकच्या शोरूमचे उद्घाटन शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांच्या पत्नी पुष्पलता पाटील यांच्या हस्ते दि. १ जानेवारी रोजी झाले.त्यावेळी झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथ पाटील हे होते. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शनपर भाषण केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संदीप पावडे , एस.पी मोटर्सचे डायरेक्टर आशिष पवार, विराज पाटील , श्रद्धा पाटील, शुभम पाटील ,शिवसेना तालुकाप्रमुख सागर आळशी , सामाजिक कार्यकर्ते निकी नाईक , आधार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गंगाराम वारंगडे यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.