Home यवतमाळ श्री खुशाल नागपुरे यांना श्रमसंस्कार-2023 पुरस्कार ,”एस एल फाउंडेशन चा उपक्रम”

श्री खुशाल नागपुरे यांना श्रमसंस्कार-2023 पुरस्कार ,”एस एल फाउंडेशन चा उपक्रम”

129

यवतमाळ (प्रतिनिधी) : दाते कॉलेजमध्ये 1994 पासून सोबत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या एस एल फाउंडेशन मार्फत पर्यावरण व सामाजिक विषयांतील विविध उपक्रम राबविणे जातात. समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्यांना गतवर्षीपासून श्रमसंस्कार पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

यावर्षीचा पुरस्कार आर्णी येथील वृद्धाश्रमाचे संचालक श्री. खुशाल नागपुरे यांना माजी शिक्षणमंत्री श्री. वसंतराव पुरके यांचेहस्ते देण्यात आला. व्हेनेशीयन सभागृहात मैत्र जीवांचे @26 या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विनायकराव दाते यांचेसह एस एल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. गतवर्षीचा पुरस्कार नंदादीप मनोरुग्ण निवारा केंद्राचे संचालक श्री. संदीप शिंदे यांना ‘नमन प्रभू’ या कार्यक्रमात देण्यात आला होता.

यानंतर श्री. दाते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एस एल फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करीत भविष्यातही फाउंडेशनच्या माध्यमातून असेच सेवाकार्य घडण्यासाठीच्या शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमाचे उदघाटक आणि मुख्य अतिथी श्री. पुरके यांनी देखील आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा देत समाजभान राखलेल्या फाउंडेशनच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. श्री. नागपुरे यांचा मान्यवरांनी सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुस्तक, रोपाची कुंडी, रोख 5 हजार व पुष्प देऊन गौरव केला. श्री. नागपुरे यांनी सत्काराला उत्तर देत आपल्या वृद्धसेवेचा यज्ञ भविष्यातही अखंड सुरु ठेवणार असल्याचे आश्वासित केले. एस एल फाउंडेशनने आजपर्यंत केलेल्या सेवाकार्याचा परिचय श्री. अश्विन सवालाखे यांनी आपल्या प्रास्ताविकातून करून दिला. प्रचिती काळे आणि सुचिता गुघाणे यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. दिनेश विडुळकर आणि जीवन पळसोकार यांनी उपस्थित्यांचे आभार मानले. फाउंडेशन मार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सानंद सेवा सहयोग’ या उपक्रमाची वर्षपूर्ती डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वर्धा येथे पवनार व सेवाग्राम येथे करण्याचा ठराव सर्वानुमते संमत झाले. आयोजनाकरिता फाउंडेशनचे सविता ढाले, अतुल टाके, अविनाश बोबडे, आशिष हिंगलासपूरकर, नितीन हेमने, कल्पना मोरे, रिता टेके, विनोद एकूण्डवार, बाबुसिंग राठोड, मंगेश आजने, आशिष गायकी, तृप्ती पाळेकर, आशिष शिरभाते, मंगेश चौधरी, विलास लोहकरे, आशिष मिश्रा आदी विविध समिती सदस्यांनी सहकार्य केले.
चौकट
*नेत्रदानाकरिता संकल्प पत्र*
कार्यक्रमात शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील नेत्ररोग विभागातील तज्ञांनी उपस्थितांना पिपिटीद्वारे नेत्रदानाविषयी माहिती दिली. यावेळी एकूण 14 सदस्यांनी नेत्रदानाचा मानस व्यक्त करून संकल्प पत्र भरले.

चौकट
*कला व सांस्कृतिकचीही पर्वणी*
यावेळी गीत गायन, नृत्य, कविता, नाट्य, कथा, संवाद आदी कला व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. त्याचे बहारदार सूत्रसंचालन युवा कलावंत श्री. जयंत चावरे आणि श्री. कपिल बोरुंदिया यांनी केले.