Home यवतमाळ जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये डिस्ट्रिक्ट लेवल स्विमिंग चॅम्पियनशिप व स्टुडन्ट लीड कॉन्फरन्सचे आयोजन

जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये डिस्ट्रिक्ट लेवल स्विमिंग चॅम्पियनशिप व स्टुडन्ट लीड कॉन्फरन्सचे आयोजन

141

ॲक्वाटिक असोसिएशन यवतमाळ, लक्ष्मी लाईफ स्पोर्ट्स अकॅडमी आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी जाजू इंटरनॅशनल स्कूल यवतमाळच्या मिनी ऑलंपियाड लेवल स्विमिंग पूलमध्ये सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी स्विमिंग चॅम्पियनशिप होत आहे. या निमित्याने डॉ प्रोफेसर प्रवीण लांबखाडे राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालयाचे क्रीडा धोरण संचालक तसेच महाराष्ट्र जलचर ॲम्युचर असोसिएशन कौन्सिल सदस्य प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत.


यवतमाळ पोलीस अधीक्षक माननीय श्री पवन बनसोड सर, जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय श्री संजय पांडे सर, यवतमाळचे तहसीलदार डॉ. योगेश देशमुख सर, असोसिएशन मेंबर लक्ष्मी लाईफ ॲक्वाटिक ग्रुप सेक्रेटरी ऑफ वर्धा हेड कोच रंजना वानखडे मॅडम, एन.एस.एन.आय.एस.कोच अनिल पांडे सर, एन.आय.टी. स्विमिंग कोच स्वप्नील सर, तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी जाजू सर, सचिव माननीय आशिषजी जाजू सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिल्पा जाजू मॅडम, पुनम जाजू मॅडम, गणेश तेलेवार सर, उपमुख्याध्यापक विजय देशपांडे सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन यवतमाळचे तहसीलदार डॉ. योगेश देशमुख सर यांच्या द्वारे व्हिसल वाजवून चॅम्पियनशिपचे उद्घाटन करण्यात आले.


सध्या २५ व ५० मिटर फ्री स्टाईल, ब्रीस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय, बॅक स्ट्रोक, तसेच १०० व २०० मिटर फ्री स्टाईल व ब्रीस्ट स्ट्रोक या सर्व स्पर्धा सुरू आहेत. त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सायन्सची स्टुडन्ट लीड कॉन्फरन्स ही स्पर्धाही सुरू आहे.
सर्वांनी दोन्ही स्पर्धांचा मनसोक्त आस्वाद घ्यावा आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचा आत्मविश्वास वाढवावा.