Home विदर्भ राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा वर्धा येथे संपन्न

राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा वर्धा येथे संपन्न

191

राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा ही वर्धा येथे दिनांक १८/११/२०२३ ते १९/११/२०२३ रोजी संपन्न झाली. या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत यवतमाळ येथील विदर्भ कराटे क्लबच्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत सात गोल्ड मेडल 13 सिल्वर मेडल 11 ब्रास मेटल असे एकूण 31 पदके पटकावत घवघवीत यश संपादन केले.यामध्ये खेळाडू रिशीका भगत, कस्तुरी भोले ,रितीजा भगत,शिवाई मुडे, शोर्य चोपडे,शिवांश अडकीने,मानव राठोड, आरोही जिवतोडे,आनंद देवकते, आराध्या काटेखाय़े, स्पंदन शेंद्रे, क्रिष्णा वासू, शर्वरी जिवतोडे ,प्रथ्वी पांडे ,आरोशि हिंगासपुरे, गणिका जांगीड,कृतिका गुप्ता, संस्कृती राठोड, अनुष्का झाडोले,अखिलेश एलरवार, ओम गुजरकर, चिन्मय ससनकर ,हर्षल जांगीड खेळाडूंनी यवतमाळ शहराचे नाव उंचावले. यास्पर्धेत भारतातून वेगवेगळ्या राज्यांनी सहभाग नोंदवला.


या स्पर्धे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून सेन्साई चंद्रशेखर भीमटे यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच यास्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन वयोगट १४ अंतर्गत प्रथम पारितोषिक हे खेळाडू रीतींजा भगत व तृतीय पारितोषिक हे रिशीता भगत यवतमाळ येथील खेळाडूना देण्यात आले. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन वयोगट १९ मध्ये प्रथम पारितोषिक अनुष्का झाडोले व द्वितीय पारितोषिक हे कृतिका गुप्ता या यवतमाळच्या खेळाडूना देण्यात आले. या यवतमाळच्या चारही खेळाडूंना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन मानचिन्हाने सम्मानित करण्यात आले.
यशस्वी खेळाडू यवतमाळनगरीत आल्यावर दिनांक २१/११/२0२३ रोजी यवतमाळचे नागरिक व पालक वर्गानी एक छोटा खाने कार्यक्रम आयोजित करून मा.प्राध्यापक नीलेश भगत सर, मा. नीरज वाघमारे जिल्हाअध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यवतमाळ, सौ. सविता शामराव भीमटे सौ. अंजू व विजय जांगीड, श्री रितेश भगत (IWOA) सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत या यशस्वी खेळाडूंचा सत्कार विश्वकर्मा मंदिर परिसर अजंनिय सोसायटी वडगाव,यवतमाळ येथे करण्यात आला. नागरिक व पालकवर्गाकडून अभिनंदनचा वर्षाव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ,सुत्रसंचालन ,आभार हे श्री रितेश भगत (IWOA) सदस्य यांनी केले.या कार्यकमाला श्री प्रेम गुप्ता, सचिन शेंद्रे, शशिकांत आडकिने, जिवतोडे सर, अमोल मुडे साहेब यांचे सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला.