Home यवतमाळ पारवा वन परिक्षेत्र कार्यालयातंर्गत वन्यजीव सप्ताहनिमित्त वन विभागाकडून जनजागृती..!

पारवा वन परिक्षेत्र कार्यालयातंर्गत वन्यजीव सप्ताहनिमित्त वन विभागाकडून जनजागृती..!

150

➡️ पारवा वन परिक्षेत्र कार्यालयातंर्गत वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम..!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी, 9 ऑक्टोंबर :- पांढरकवडा वन विभागाच्या प्रादेशिक वनविभाग पारवा वनपरिक्षेत्र कार्यालयातंर्गत वन्यजीव सप्ताहनिमित्त वन्यजीवांचे संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे या वेळी त्यांचे महत्त्व सांगण्यात आले.

वन्यजीव सप्ताहा निमित्त वृक्षारोपण मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

या मोहिमेत कुर्ली बिटचे वनपाल धम्मानंद मेश्राम यांनी वन्यजीव सप्ताह साजरा कां केला जातो, वनसंवर्धन व संरक्षण काळाची गरज, याबाबत मार्गदर्शन
केले.

भारतात १९५२ पासून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. पशु पक्ष्यांबाबत जागृती निर्माण करणे असे आवाहन यावेळी करण्यात आले. हा त्या मागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. वन परिक्षेत्रावर शेती, रस्ते, बांधकाम रूपाने होणारे मानवी आक्रमण मर्यादेपलीकडे गेले की वन्यजीव जंगलाच्या सीमेवरील खड्डयात शिरून वन्यप्राणी गायी – गुरे मरतात. त्यातून मानव व वन्यजीव असा लढा उद्भवतो. जंगल सीमेवरील स्थानिकांनी योग्य माहिती व मार्गदर्शन तसेच वन्यजीवांबद्दल माहिती देऊन त्यांचा जीवनक्रम समजून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
वन्यजीव सप्ताहात जंगलतोड व अतिक्रमण हटवा याला विरोध दर्शविण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

या प्रसंगी पारवा येथील वन परिक्षेत्र अधिकारी मनीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पारवा येथील वनपाल रऊफ शेख, कुर्ली येथील वनपाल धम्मानंद मेश्राम आदींच्या नेतृत्वात वनपाल शांतिदुत मुळे, एस. बी. सोडगीर, बी. सी. जाठवा, एस. एस. यसनसुरे, एस. पी. जाधव, ए. एस. जामकर, ए.के. गजबे, आत्राम, पूजा सिडाम, ताई राजमाने, प्रेमीला सिडाम आदीं वन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

जनजागृती मोहिमेत वन कर्मचाऱ्यांनी वन्य जीवांच्या संरक्षणासाठी आवाहन केले. मानव व वन्यजीवांचा संघर्ष टाळण्यासाठी या वेळी उपाययोजना सांगितल्या.

तसेच शनिवारी कुर्ली येथील केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेत वन्यजीव सप्ताहानिमित्त समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात वन्यप्राणी यांचेवर चित्रकला व निबंध स्पर्धा घेऊन वन्य जीव सप्ताह यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.