
भारतीय जनता पार्टी ओबीसी जागर यात्रेचे शुभारंभ दि.2 ऑक्टोबर 23 रोजी पार्डी (नागपूर) येथील संत नगाजी माहाराज यांच्या पावन भूमीतून मा.ना.आ. चंद्रशेखजी बावनकुळे प्रदेश अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेली भाजपा ओबीसी जागर यात्रा दि.3 ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथून पांढरकवडा मार्गे चंद्रपूर जाणार्या ओबीसी जागर यात्रेचे रूंझा येथे भव्य सत्कार करण्यात आले,

याप्रसंगी ओबीसी जनसमुदा तथा जिल्हाध्यक्ष मोहन जाधव भाजपा व्हीजेएनटी आघाडी, शेरूभाई तिघाले अध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी ता.पांढरकवडा, सुदामभाऊ दारव्हणकर जेष्ठ सा. कार्यकर्ते, शब्बीरभाई तिघांचे, पंकजजी अक्कलवार, राजेश राठोड, किरण राठोड, रावडी राठोड, विलास पवार, हीतेश राठोड, भावरावजी राठोड, बूथ प्रमुख तसेच परिसरातील शिवणी, आंबेझरी, कोच्ची, घाटूंबा, रामपुर,कारेगाव पाथ्री येथील ओबीसी समाज बांधव भगिनी यांनी शौर्य यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक भाजपा ओबीसि मोर्च्या प्रभारी डॉ.आशिषजी देशमुख, प्रदेश अध्यक्ष ओबीसी मोर्चा श्री संजयजी गाते, श्री. तारेंद्रजी बोर्डे जिलाध्यक्ष भाजपा, ओबीसि मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री राजूभाउ डांगे, श्री सुनिल समदूरकर जिल्हाध्यक्ष,ओबीसी मोर्च्या यांचे पुष्पहार व पुष्प वृष्टी करून स्वागत केले, जागर यात्रेत महाराष्ट्र प्रदेश ओबीसी पदाधीकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होते.













































