Home यवतमाळ खरंच खासदार हेमंत पाटिल प्रमाणेच राज्यातील सर्वच खासदार हे करतील का??

खरंच खासदार हेमंत पाटिल प्रमाणेच राज्यातील सर्वच खासदार हे करतील का??

199
….मराठवाड़ा विभागातील हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील डीन वाकोडे यांना संडास साफ करायला लावल्याच्या विडियोमुळे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे . वास्तविक पाहता राज्यातील कोणत्याही सरकारी दवाखान्यातील परिसरात जर तुम्ही चक्कर टाकली तर तुम्हाला आजूबाजूला घाणीचे साम्राज्य पाहायला नक्कीच मिळेल . सर्वच सरकारी दवाखान्यांनमध्ये असलेल्या संडास बाथरूमची अवस्था अतिशय दयनीयचं असते यात शंकाच नाही , तसेच रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी जरी असली तरी सर्व सामान्यांना त्या रुग्णालयाचे सर्वात मोठे अधिकारी डीन यांचीच जबाबदारी असते परंतु
कोणत्याही दवाखान्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनिस्त राहुन काम करत असलेल्या कर्मचाऱ्याकडून व्यवस्थित काम करून घेतले पाहिजे परंतु कर्मचारी एकदा सफाई करून गेले की नंतर दिवसभर त्या वार्डाकडे, परिसराकडे भिरकुन सुध्दा पाहत नाहीत आणि मग सर्वत्र घाणच घाण होते . त्याच बरोबर रुग्णालयातील अनेक टाकाऊ वस्तू खिडकीबाहेर तसेच मोकळ्या जागेत टाकलेल्या असतात . अनेक ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था ठीक – ठाक नसल्यामुळे सर्वत्र चिलट – माशा , घान तसेच कुत्र्या मांजरासह डुकराचा मुक्त संचार कितेकदा पाहायला मिळतो व पाहिलाही असेल यात शंका नाही.
एखाद्या रुग्णालयात मृत्यूची संख्या वाढत असेल तर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळणे साहजिक आहे .सर्व वर्तमानपत्र सोशल मीडिया व टीव्ही चालू करून जेव्हा नांदेडच्या सरकारी रुग्णालयातील मृत्यूच्या संख्या बदल बातम्या यायला लागल्या तेव्हा खासदार हेमंत पाटील यांनी तेथे भेट दिली . जेव्हा स्वतः डीन वापरत असलेल्या स्वच्छालयाचीच अवस्था चिंताजनक होती तर रुग्णालयातील शौचालयाची काय अवस्था असेल ही कल्पना आपण न केलेली बरी…महाराष्ट्रामध्ये सर्वत्र डेंगू मलेरियाचे थैमान पसरलेले असताना या बिमारीला अस्वच्छता हेच कारण असल्यामुळे खासदार हेमंत पाटील यांना संताप येणे साहजिकच आहे .खासदार हेमंत पाटील हे लोकप्रतिनिधी आहेत व त्यांनी साहेबाला स्वतःच्या संडासची सफाई करायला लावली असली तरी स्वतः खासदार साहेब त्या संडासमध्ये पाणी टाकत असल्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहे.
लाखो रूपये पगार घेऊन सुद्धा कर्मचाऱ्यांमध्ये काम चुकार पणा व बेपर्वा वृती वाढलेली आहे .प्रत्येक ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये काम चुकारपणा वाढलेला आहे . वरिष्ठांनी सांगितले तेवढेच ते काम करतात व पुन्हा शांत बसतात , आपल्या वरिष्ठांनी त्यांना वारंवार काम सांगावे लागते का ? पण वरिष्ठ अधिकारी म्हणून खासदार साहेबांनी या प्रकरणात थोडी कडक भूमिका घेतली तर सर्व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे आणि शिस्तीचे वातावरण निर्माण व्हायला पाहिजे होते पण तसे न होता खासदार साहेबावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून आपल्या चुकावर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसतो , खासदर हेमंत पाटील यांना अटक तर होणारच नाही कारण एखाद्या खासदाराला अटक करायची असेल तर लोकसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते असे कळते आणि ती मिळणार ही नाही पण विरोधकांना बोंबलण्यासाठी हत्यार मात्र नक्कीच मिळाले यात, शंका नाही.
राज्यात नोकरी – नोकरी म्हणून तरुण , तरुणी रस्त्याने भटकत आहेत पण काम चुकार कर्मचाऱ्यांचा लाड का केला जातो हेज कळत नाही
कामचुकार कर्मचाऱ्यांना ताबडतोब बडतर्फे करा म्हणजे लोक प्रतीधिनीना टोकाचे पाऊल उचलण्याची पाळी येणार नाही .प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेऊन आपल्या अधिनस्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून शिस्तीत काम करून घेतलं पाहिजे तरच प्रशासनाचा प्रत्येक विभाग सुधारेल नाही तर गाढवाचा गोंधळ आणि लाथाचा सुकाळ तर सुरूच राहिल मात्र खासदार हेमंत पाटील यांनी घेतलेली भूमिका काही लोकांना चुकीची वाटत असली तरी प्रशासकीय व्यवस्था सुधारायची असेल तर असे निर्णय घेणे काळाची गरज आहे हेही तेवढेच महत्वाचे…!