Home यवतमाळ घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल माळकर यांच्या हस्ते नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांचा...

घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल माळकर यांच्या हस्ते नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार..!

219

➡️ घाटंजी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अमोल माळकर यांची प्रमुख उपस्थिती..!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी : स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत राबविल्या गेलेल्या पंधरवाडा या कार्यक्रमाचा समारोप नगर परिषद शाळा क्रमांक 5 च्या प्रांगणात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात आला.

या प्रसंगी घाटंजी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अमोल माळकर व जी. एम. बंडीवार यांनी महापुरुषांच्या प्रेरणादायी जिवणावर प्रकाश टाकत. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घाटंजी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अमोल माळकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश घोती, नितीन हातमोडे, मुख्याध्यापिका कु. सिंधुताई सिडाम ह्या होत्या.

या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची वेशभूषा केली होती. नंतर प्रभागातून प्रभात फेरी काढण्यात आली.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून घाटंजी शहराला स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र झटणारे सफाई कर्मचारी संदीप बिसमोरे, रवि बिसमोरे, आनंद बिसमोरे, राम बिसमोरे व कचरु बिसमोरे आदींचा मुख्याधिकारी अमोल माळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच घाटी येथील नगर परिषद शाळा क्रमांक 5 चा विद्यार्थी शिवम कवडु मेश्राम याचा पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातंर्गत एकलव्य साठी निवड झाल्याने शिवमचे वडील कवडु मेश्राम व आई सौ. विमल मेश्राम हिचा देखील मुख्याधिकारी अमोल माळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन कु. स्विटी कपिले यांनी केले. प्रास्ताविक नविन देशट्टीवार यांनी केले. तर आभार ज्ञानेश्वर गावंडे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घाटी नगर परिषद शाळा क्रमांक 5, नगर परिषदेचे कर्मचारी आदींनी अथक परिश्रम घेतले.