Home यवतमाळ घाटंजी महसुल विभागाने मानोली जवळ रेतीचा ट्रक्टर पकडला.

घाटंजी महसुल विभागाने मानोली जवळ रेतीचा ट्रक्टर पकडला.

263

➡️ परिविक्षाधीन तहसीलदार तथा अपर तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांनी रेतीचा ट्रक्टर जप्त करुन पुढील कारवाईसाठी घाटंजी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला..!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी, 2 ऑक्टोंबर : सोमवारी घाटंजी येथील महसुल विभागाने घाटंजी तहसीलचे तहसीलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा मानोली येथे अवैध रेती वाहतूक करणारा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर एक ब्रास रेतीसह परिविक्षाधीन तहसीलदार तथा अपर तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांच्या पथकाने ताब्यात घेतला.

सदर रेतीचा ट्रक्टर पुढील कारवाई साठी घाटंजी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सदर कारवाई परिविक्षाधीन तहसीलदार तथा अपर तहसीलदार मोहनिष शेलवटकर, मंडळ अधिकारी जी. एस. राऊत, तलाठी बिरमोल तायडे, तलाठी नरेंद्र चवडे आदींच्या उपस्थित कारवाई करण्यात आली.