Home यवतमाळ घाटंजी तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी चिखलवर्धा येथील अबरार पाटील यांची निवड..!

घाटंजी तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी चिखलवर्धा येथील अबरार पाटील यांची निवड..!

108
➡️ भद्रावतीच्या आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान.!
( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी, 22 सप्टेंबर :- घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील अबरार पाटील यांची घाटंजी तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांना भद्रावतीच्या आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी आदिवासी काॅग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे, भद्रावतीच्या आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेचे ज्येष्ठ नेते अब्दुल रफीक पाटील, घाटंजी तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष एखलाख पाटील, आर्णी केळापूर विधानसभा प्रमुख स्वानंद चव्हाण, काँगेसच्या ज्येष्ठ नेत्या वैजयंती ठाकरे, पारवा येथील सरपंच संगीता मडावी, घाटंजी पंचायत समितीचे माजी सभापती रुपेश कल्यमवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयप्रकाश काटपेल्लीवार या सह काॅग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.