Home यवतमाळ विदर्भाच्या चिंतामणी नगरीत देहविक्रीचा व्यवसाय सक्रिय?

विदर्भाच्या चिंतामणी नगरीत देहविक्रीचा व्यवसाय सक्रिय?

122

कळंब पोलीस अनभिज्ञ ! आता तरी लक्ष देतील काय?

यवतमाळ – कळंब महाराष्ट्र सह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र चिंतामनी तद्वतच विदर्भाचे अष्टविनायक म्हणून ओळख असलेल्या कळंब धार्मिक नगरीत गेल्या काही महिन्यापासून अवैध कुटंनखाने सुरू असल्याचे चित्र व चर्चा कळंब शहारात ऐकायला येत आहे या प्रकरणी पोलीस अनभिज्ञ आहेत हे मात्र नवलच
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब शहर हे धार्मिक दृष्ट्या व प्राचीन दृष्ट्या महत्त्वाचे शहर असून धार्मिक दृष्ट्या श्री क्षेत्र चिंतामनी तद्वतच विदर्भाचे अष्टविनायक म्हणून ख्याती आहे काही युवक झटपट श्रीमंत होण्याचे नादात गरीब कुटूंबातील मुलीना फसवून त्यांच्याकडून अनैतीक देहव्यापार करून घेत असल्याचे कळंब शहरात चर्चा रंगताना दिसत आहे मुलीकडून जबरदस्तीने देहव्यापार करून घेणे कायद्याने गुन्हा असून मात्र कळंब शहारात कधी व्हाट्सअप च्या साह्याने तर भ्रमणध्वनीच्या सहाय्याने छुप्या पद्धतीने अनेक ठिकाणी देहव्यापार सुरू असल्याचे चर्चेला उधाण आले आहे याकडे कळंब पोलिस लक्ष देतील काय? असा प्रश्न सामान्य जनता उपस्थित करीत आहे.