
➡️ शासनाकडून निधी प्राप्त होताच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची रक्कम अदा करण्यात येईल..!
( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी – घाटंजी तालुक्यातील पारवा वनपरीक्षेत्र कार्यालयातंर्गत येणाऱ्या अनेक गावातील शेतकऱ्यांचे सन 2022 मध्ये वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान झाले होते. या बाबत अनेक शेतकऱ्यांनी पारवा वनपरीक्षेत्र कार्यालयात अर्ज दाखल केले होते. अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी करून वनविभागाकडून पंचनामे करण्यात आले. मात्र, एक वर्ष लोटुनही शेतकऱ्यांच्या खात्यात वन विभागाकडुन नुकसानीचे अनूदान जमा करण्यात आले नाही.
याबाबत शेतकरी वनविभागाच्या कार्यलयात चकरा मारतांना दिसत असुन पारवा वन परिक्षेत्र अधिका-याने तात्काळ शेतक-यांच्या खात्यात नुकसानीची भरपाई जमा करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.
➡️ दरम्यान, कुर्ली विभागातील वन क्षेत्र सहाय्यक तथा वनपाल डी. ए. मसराम यांचेशी संपर्क केला असता,
सावरगांव, मंगी, सगदा, गणेरी, भिमकुंड, ठाणेगांव व ईतर गावातील शेतकऱ्यांचे 400 ते 500 अर्ज पारवा वन परिक्षेत्र कार्यालयात प्राप्त असुन शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रस्ताव वन परिक्षेत्र अधिकारी पारवा यांचे कडुन पांढरकवडा उप वन संरक्षक कार्यालयात पाठविण्यात आला आहे. तसेच शासनाकडून 80 लाख रुपये मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव वन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला आहे. संबंधित निधी शासनाकडून प्राप्त होताच तात्काळ नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची रक्कम अदा करण्यात येईल, अशी माहिती वन क्षेत्र सहाय्यक तथा वनपाल डी. ए. मसराम यांनी दिली आहे.











































