Home यवतमाळ वणी येथील खुन प्रकरणातील आरोपीची केळापूर न्यायालयातून निर्दोष मुक्तता ..!

वणी येथील खुन प्रकरणातील आरोपीची केळापूर न्यायालयातून निर्दोष मुक्तता ..!

161
➡️ केळापूर येथील न्यायाधिश 2 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल..!
( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
यवतमाळ/घाटंजी, 2 सप्टेंबर :- वणी येथील खुन करुन पुरावा नष्ट केल्याच्या प्रकरणात आरोपी संजय शामराव सालवटकर यांस पांढरकवडा येथील न्यायाधिश 2 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. देशमुख यांनी संशयाच्या आधारावर निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात आरोपी तर्फे ॲड. एस. एम. अली (यवतमाळ) यांनी युक्तिवाद केला.
वणी येथील वंजारी शिवारात दिनांक 10/12/ 2020 रोजी जया मनोज आवारी (वय 32 वर्ष) हिचा मृत्यू झाल्याचे आढळून आले होते. त्यात वणी पोलीसांनी चौकशी करून मृतक यांचा संजय शामराव सालवटकर यांच्याशी असणाऱ्या प्रेमसंबंधातून व पैशाच्या वादातून खून केल्याचे समजले. मृतकाचे वडील भगवान मोतीराम मत्ते (वय 65 वर्ष) यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भा.द.वि कलम 302 (खुन करणे), 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत FIR नोंदविला होता. सदर FIR वरून पोलीसांनी श्वानपथक, फिंगरप्रिंट तज्ञ व अन्य साक्षरतारांची साक्ष नोंदवून पांढरकवडा येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी विरुद्ध आरोप पत्र दाखल केले होते.
सदर केस मध्ये सरकारी पक्षाच्या वतीने श्वानपथक पुरावा व यांच्या सोबत 14 साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली. त्यातील एकाही साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली नाही. म्हणजेच एकही साक्षीदार फितुर झाला नाही, हे विशेष.
सदर प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. एस. एम. अली (यवतमाळ) यांनी युक्तिवाद केला.
यावरून पांढरकवडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश ए. एम. देशमुख यांनी सरकारी पक्ष व आरोपी पक्ष या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी संजय शामरावजी सालवटकर यांची संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली.
आरोपीतर्फे‌ ॲड. एस. एम. अली (यवतमाळ) यांनी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. राहुल पाटील, ॲड. मनीष भगत, ॲड. एस. टी. अली आदींने सहकार्य केले.