Home बुलडाणा ठाणेदार बदलताच साखरखेर्डा येथील बस स्टँड वरील तिसरा डोळाच गेला चोरीला ,...

ठाणेदार बदलताच साखरखेर्डा येथील बस स्टँड वरील तिसरा डोळाच गेला चोरीला , ,

144

 

अमीन शाह

बुलडाणा ,

साखरखेर्डा येथील बस स्टँड वर गेल्या वर्षी गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी तत्कालीन ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी सीसीटीव्ही कँमेरे लावले होते ते सुरक्षेच्या दृष्टीकोनातून फारच महत्वाचे होते बस स्टँड वर गुन्हेगारी चे प्रमाण कमी झाले होते त्या कँमेऱ्या मुळे येणारी जाणारी वाहने चिडीमारी करणारे टवाळखोर किरकोळ भांडणे करणारे यावर लक्ष ठेवणे फार सोयीचे होते बस स्टँड वरील गतीविधी वर लक्ष ठेवण्यासाठी तत्कालीन ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी ते केमेरे लावले होते मात्र गेल्या काही दिवसां पासून हे कँमेरे गायब झाले आहेत गायब झालेले ते केमेरे पुन्हा लावण्यात यावे अशी मागणी केली जात आहे , गेल्या वर्षी केळवद येथे स्टेट बँकेत पडलेल्या दरोडा प्रकरणी पोलीस विभागाला या कँमेऱ्याची महत्वपूर्ण साथ मिळाली होती ,

————————– – ———– —

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मी दोन सी , सी , टीव्ही कँमेरे बस स्टँड च्या मध्यवर्ती भागात लावले होते माझी बदली झाल्या नंतर ते कँमेरे कोणी काढून नेले हे मला माहित नाही ,

जितेंद्र आडोळे

पूर्व ठाणेदार पो , स्टे , साखरखेर्डा

———————————– ——

मी येथे रुजू झाल्या पासून मला या कँमेऱ्याच्या बाबतीत काहीच माहिती नाही ते कोणी चोरुन नेले याचा तपास मी लावणारच आहे सुरक्षेच्या दुष्टिकोणातून महत्वपूर्ण असलेले हे केमेरे मी पुन्हा माझ्या सव खर्चातून लवकरच त्याच ठिकाणी लावणार आहे ,

नंदकिशोर काळे ,

ठाणेदार पो , स्टे , साखरखेर्डा ,

याच पोल वरील केमेरे लंपास झाले आहेत ,