
सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा येथील
मुकेश प्रकाश मगर वय ३२ वर्षे ह्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मुकेश प्रकाश मगर या युवकाने आज दि. ७ ऑगस्ट
९.०० वा. पूर्वी साखरखेर्डा शिवारातील नितीन महाजन यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे.
या प्रकरणी विलास सखाराम मगर (वय ५२ वर्षे) यांच्या माहितीवरुन साखरखेर्डा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून,
ठाणेदार नंदकिशोर काळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार बाजीराव खरात, लक्ष्मण इनामे यांनी पंचनामा करीत, मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात पाठविला असून, पुढील तपास साखरखेर्डा ठाणेदार व सहकारी करीत आहेत.
शवविच्छेदन झाल्यानंतर साखरखेर्डा येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.












































