Home यवतमाळ चिखलवर्धा येथे महसुल विभागाने रेतीचा ट्रक्टर पकडला..!

चिखलवर्धा येथे महसुल विभागाने रेतीचा ट्रक्टर पकडला..!

114

( अयनुद्दीन सोलंकी )

————————
घाटंजी : घाटंजीचे तहसिलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजीचे निवासी नायब तहसीलदार शिवाजी जाकापूरे यांचे पथकाने घाटंजी तालुक्यातील तालूक्यातील चिखलवर्धा येथे अवैध रेती वाहतूक करणारा अमोल राठोड यांच्या मालकीचा विना क्रमांक ट्रॅक्टर एक ब्रास रेतीसह ताब्यात घेतला. तसेच पुढील कारवाई साठी सदर ट्रक्टर पारवा पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे.

रेती कारवाई दरम्यान पथकात निवासी नायब तहसीलदार शिवाजी जाकापुरे, कुर्लीचे मंडळ अधिकारी प्रविण कांबळे, मंडळ अधिकारी रवींद्र शिंदे, शिरोलीचे मंडळ अधिकारी अनिल येरकर तलाठी रवी राठोड, तलाठी पवन बोंडे, कोतवाल ईस्तारी आपतवार, चालक अभी तिवारी, पोलीस शिपाई महाजन, पारवा पोलीस स्टेशनचे वाहतुक शिपाई सुनिल कुडमथे आदीं उपस्थित होते.