
अयुद्दिन सोलंकी
घाटंजी : तालुक्यातील सावंगी (संगम) व इतर पुरग्रस्त भागात भागाची आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी पाहणी करून घाटंजी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी घेतला.

यावेळी अतिवृष्टीग्रस्त भागात युद्ध पातळीवर पंचनामे करून नागरिकांना मदत उपलब्ध करून देण्यात यावी, नागरिकांना रेशनच्या माध्यमातून अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात यावे, अतिवृष्टी ग्रस्त भागात रोगराई पसरणार नाही याची दक्षता घेऊन औषधी फवारण्यात यावी असे आदेश आर्णी केळापूरचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी तालुका प्रशासनाला दिले आहे.
परिविक्षाधीन तहसीलदार मोहनिश सेलवटकर, तालुका आरोग्य अधिकारी धर्मेश चव्हाण, कृषी अधिकारी इंगोले, गट विकास अधिकारी महेश ढोले, घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल माळकर, घाटंजचे ठाणेदार निलेश सुरडकर, विद्युत विभागाचे अभियंता, जिल्हा परिषदे बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता धनंजय चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुभाष भोयर व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
या पुरग्रस्त पाहणी दौऱ्यात कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सचिन पारवेकर, भाजपाचे घाटंजी तालुकाध्यक्ष सुरेश डहाके, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास पारवेकर, सावंगी संगम येथील माजी सरपंच अजय यल्टीवार, नितीन नार्लावार, भाजपाचे घाटंजी शहर अध्यक्ष बालु खांडरे, संदीप माटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश खरतडे, बंडु डंभारे, वघारा टाकळीचे माजी सरपंच भगवान सक्कनवार, अनुप अप्पनवार, आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचे स्विय्य सहाय्यक दिलीप पवार, अंकुश ठाकरे, चेतन जाधव, प्रमोद अलुरवार, नरेंद्र चव्हाण, अशोक संकुरवार, माणिक चव्हाण, विकास नैताम, पंकज ठाकरे, अमित महल्ले, मानगांवकर काका, गजानन निलावार, श्रीनिवास कंदेवार, प्रवीण चव्हाण व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.












































