Home यवतमाळ घाटंजी शहरात समाजसेवी, स्वंयसेवी संस्थेतर्फे पुरग्रस्त गरजुं लाभार्थ्यांना घाटंजीचे उद्योजक राम अग्रवाल...

घाटंजी शहरात समाजसेवी, स्वंयसेवी संस्थेतर्फे पुरग्रस्त गरजुं लाभार्थ्यांना घाटंजीचे उद्योजक राम अग्रवाल यांचे हस्ते धान्याचे किट, ब्लँकेट, चादर इत्यादी वाटप..!

107

अयनुद्दीन सोलंकी



घाटंजी – घाटंजी शहरातील वाघाडी पुरग्रस्त गरजुं लाभार्थ्यांना घाटंजीचे उद्योजक राम अग्रवाल यांच्या हस्ते धान्याची किट, ब्लँकेट, चादरी इत्यादीचे वाटत करण्यात आले. या वेळी त्यांच्या समवेत घाटंजी शहरातील समाजसेवी संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

घाटंजी तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या ढगफुटी सदृश्य संततधार पावसामुळे घाटंजी तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातच घाटंजी शहरातील वाघाडी नदी काठावरी वास्तव्यास राहणाऱ्या गरीब कुटुंबाचे सुद्धा मोठे नुकसान झाले. वाघाडी नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका नदी काठच्या रहिवाशांना बसला आहे.

या पुरामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली. घरात 4/5 फूट एवढं पाणी साचल्याने घरातील अन्नधान्य संपूर्ण खराब झाले आहे. घरातील कपडे, चादरी, ब्लॅकेट पाण्यात, चिखलात खराब झाली आहे. घरातील अति महत्वाची कागदपत्रे पुरात वाहून गेल्या आहे. इलेक्ट्रिक उपकरणे पाण्यात डुबल्याने खराब झाली आहे. या गरीब कुटुंबांचे मोठं नुकसान झाल्यामुळे घाटंजी शहरातील स्वयं सेवी संस्थानी पुढाकार घेऊन पुरग्रस्त महीला पुरुषांना धान्याचे किट, ब्लँकेट, चादरी घाटंजीचे उद्योजक राम अग्रवाल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी त्यांच्या समवेत घाटंजी शहरातील अनेक समाजसेवी संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

घाटंजीतील स्वयंसेवी संस्था, संघटना आणि समाजसेवकांनी किराणा कीट, ब्लॅंकेट, चादर इत्यादी वस्तूंचे गरजुंना वाटप केले. त्यामुळे घाटंजी शहरातील स्वयंसेवी संस्थाचे घाटंजी शहरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.