Home विदर्भ श्री क्षेत्र नारायणपूर येथे आषाढी एकादशी निमित्त उसळला भाविकांचा जनसागर “शेकडो लिटर...

श्री क्षेत्र नारायणपूर येथे आषाढी एकादशी निमित्त उसळला भाविकांचा जनसागर “शेकडो लिटर दूधाच्या चहाचे वितरण”

161

बंडु बन नारायणपूर

वर्धा –  विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र नारायणपूर येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांचा जनसागर उसळला होता पहाटे चार वाजता श्री चि महापुजा संपन्न झाली तेव्हा पासून च भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली अनेक गावावरुन दिंडी घेऊन मिळेल त्या वाहनाने तर काही भाविक पाऊले चालती पंढरीची वाट या अभंगाचे आशय घेऊन पायदळ आल्याचे दिसून आले आज सुमारे दहा ते पंधरा हजार भाविकांनी श्रद्धेने दर्शन घेतले असून आषाढी एकादशीच्या निमित्ताने ह.भ.प.दिलीप महाराज रोकडे आळंदीकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

भाविकांच्या व्यवस्थेसाठी माऊली हरीपाठ मंडळ तथा नारायणपूर ग्रामवासीयाकडुन फराळाचे वाटप करण्यात आले तर चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा येथील देव करते बरोबर मंडळा कडुन भाविकांना मोफत चहाचे वितरण करण्यात आले सदर यात्रेच्या बंदोबस्त करण्यासाठी समुद्रपुर पोलिस स्टेशन ने कर्मचारी नियुक्त केले होते यात्रेच्या यशस्वी ते साठी हर्षल पुसदेकर मंथन वैद्य निवृत्ती खडसे मुकूंद वैद्य हेमन निखाडे कैलास वैद्य आदिनी अथक परिश्रम घेतले यात्रेत सहभागी झालेल्या सर्व दिंड्याचे संस्थान चे नारळ पान व मानपान देऊन सन्मानित करण्यात आले.

बॉक्स
शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या या सोहळ्यात दूरवरून भाविक येत असतात परंतु या ठिकाणी भक्त निवास असणे आवश्यक आहे त्यामुळे दुरच्या भाविकांना मुक्काम कारणे सोईचे होईल